#WelcomeBackAbhinandan:बॉलिवूडकरांनी असं केलं अभिनंदनचं स्वागत

अभिनंदनचं बॉलिवूड कलाकारांकडून स्वागत

Updated: Mar 1, 2019, 06:22 PM IST
#WelcomeBackAbhinandan:बॉलिवूडकरांनी असं केलं अभिनंदनचं स्वागत title=

#WelcomeBackAbhinandan मुंबई : भारताचा वीर विंग कमांडर अभिनंदन आज भारतात परतले. संपूर्ण देशाच्या नजरा फक्त वाघा बॉर्डरवर होत्या. पाकिस्तानच्या घुसखोरीला उत्तर देताना अभिनंदनचं मिग 21 विमान बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या हल्ल्यात जमिनीवर पडलं. त्यानंतर अभिनंदन पाकिस्तानात जाऊन पडला. अभिनंदनने पाकिस्तानचं एक एफ-16 लढाऊ विमान पाडलं होतं. पण भारताचा दबाव आणि स्पष्ट भूमिकेमुळे अभिनंदनला पाकिस्तानने भारताला सोपवण्याची घोषणा केली. इम्रान खान यांच्या या घोषणेनंतर देशभरात आनंदाचं वातावरण होतं.

अभिनेत्री प्रीती जिंटाने अभिनंदनचं स्वागत केलं आहे. प्रीती ट्विटरवर लिहिते की, मध्यरात्र झाली आहे. मी झोपू नाही शकत आहे. अभिनंदन घरी परत येतोय. मी यावेळी फक्त त्यांच्या परिवाराच्या भावनांचा विचार करते आहे. प्रत्येक क्षण हा लाईफ टाईम सारखा वाटतो आहे. वेलकम बॅक अभिनंदन। आम्ही तुमच्या बहादुरीला सॅल्यूट करतो.'

अभिनेता रितेश देशमुखने देखील अभिनंदनचं स्वागत केलं आहे.