अंगावर काटा उभा करणारा 'अमावस'चा ट्रेलर

पाहा हा ट्रेलर

अंगावर काटा उभा करणारा 'अमावस'चा ट्रेलर

मुंबई : हॉरर सिनेमांची एक वेगळीच मजा आहे. जेव्हा या सिनेमात उत्तम टेक्नीक वापरलं जातं तेव्हा हा सिनेमा अधिक उत्तम बनतो. 'अमावस' हा सिनेमा अशाच एका गोष्टीचा साक्षीदार बनला आहे. या सिनेमाचा ट्रेलर बुधवारी रिलीज करण्यात आला. 

1920 इवल रिटर्न, अलोन आणि रागिनी एमएमएस 2 च्या नंतर भूषण पटेल एकदा पुन्हा नकारात्मक शक्तीचं दर्शन घडवणारा सिनेमा घेऊन आला आहे. 

सिनेमाचा ट्रेलर पाहून लक्षात येतं की हा सिनेमा मागच्या सगळ्या सिनेमांपेक्षा वेगळा आहे. या सिनेमाने नवीन गोष्टी स्विकारल्या आहेत. 

ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर एका जुन्या घरात एक आत्मा कैद असतो. त्याचीच कथा या सिनेमात दाखवली आहे. पण ट्रेलर बघितल्यावर लक्षात येतं की, हा सिनेमा मागच्या सिनेमापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.

रॉकस्टार फेम नर्गिस फाखरी या सिनेमात वेगळ्या अवतारात दिसणार आहे. नर्गिसचा हा लूक खूप रोमांचक आहे. हा सिनेमा अधिक ग्लॅमरस आहे. नर्गिससोबत या सिनेमात लीड रोलमध्ये सचिन जोशी असणार आहे. मोना सिंह देखील या सिनेमात वेगळ्या रुपात दिसत आहे.

मोना या सिनेमात असं कॅरेक्टर प्ले करत आहे जिला आत्मा, प्रेत यांच्याबद्दल सगळी माहिती आहे. जी व्यक्ती प्रेत, आत्माला यातून बाहेर काढणारी आहे. 

नर्गिस फाखरी के Men फैशन को लेकर हैं कुछ ऐसे ख्याल

ट्रेलर पाहताच अंगावर काा उभा राहतो. पण आता हॉरर सिनेमाच्या यादीत अमावस कोणत्या नंबरवर येतो याकडे साऱ्यांच लक्ष आहे. 

भूषण पटेल आपल्याच हॉरर सिनेमांचे रेकॉर्ड तोडणार का? याकडे साऱ्यांची लक्ष लागून राहिली आहेत. हा सिनेमा 11 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.