Kim Kardashian Kanye West Divorce : लाखो डॉलर्सच्या करारानंतर किम कार्दशियनचा तिसऱ्या पतीसोबतही घटस्फोट

Kim Kardashian Kanye West Divorce :  वैवाहिक नात्याला तडा गेल्यानंतर दोघांच्याही आयुष्यात नव्या जोडीदारांची Entry पाहायला मिळाली. पण, त्यांनीसुद्धा या दोघांची साथ दिलीच नाही. 

Updated: Nov 30, 2022, 08:46 AM IST
Kim Kardashian Kanye West Divorce : लाखो डॉलर्सच्या करारानंतर किम कार्दशियनचा तिसऱ्या पतीसोबतही घटस्फोट  title=
American star Kim Kardashian and kanye west settles divorce know the reason

Kim Kardashian Kanye West Divorce : मनोरंजन विश्वाकडून 2022 या वर्षाच्या शेवटीसुद्धा चाहत्यांना धक्काच मिळाला आहे. किंबहुना आता मिळालेल्या या वृत्ताची चाहत्यांनाही कल्पना असावी. अमेरिकन स्टार (Amrican star) आणि इंन्फ्लूएन्सर किम कार्दशियन आणि तिचा Ex Husband कान्ये वेस्ट यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता ते अधिकृतरित्या विभक्त झाले आहेत. परदेशी माध्यमांनी यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान, किम आणि कान्ये यांनी वैवाहिक आयुष्यातून विभक्त होण्याचा निर्णय घेतला त्या क्षणापासून त्यांनी आपल्या नव्या जोडीदारांना वेळ दिल्याचं पाहायला मिळालं. पण, या क्षणाला त्या दोघांनाही जीवनातील अशा प्रसंगी कोणाचीच साथ नसल्याचं स्पष्ट होत आहे. (American star Kim Kardashian and kanye west settles divorce know the reason )

लाखो रुपयांचा करार... (Kim Kardashian kanye west settlement)

किम आणि कान्ये यांच्या घटस्फोटात (Divorce) करण्यात आलेल्या करारानुसार आणि आर्थिक व्यवहारानुसार कान्येनं किमला दर महिन्याला 2 लाख युएस डॉलर्स इतकी मोठी रक्कम मुलांच्या संगोपनासाठी देणं अपेक्षित असेल. शिवाय मुलांच्या शिक्षणाचा अर्धा खर्चसुद्धा त्याचीच जबाबदारी असणार आहे. यामध्ये शिकवणी आणि मुलांच्या सुरक्षिततेवर खर्च होणाऱ्या रकमेचाही समावेश असेल. 

घटस्फोटांच्या कागदपत्रांमध्ये आणखी एक अट...  

कायदेशीररित्या करण्यात आलेल्या या घटस्फोटामध्ये आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नमूद करण्यात आली आहे. किम किंवा कान्ये केव्हाही या दोघांपैकी कोणीही चारपैकी कोणत्याही एका मुलाबाबत वादग्रस्त परिस्थितीत सापडले तर, त्या दोघांनीही यावर तोडगा काढणं अपेक्षित असेल. दोघांपैकी कुणा एकाचाही अपेक्षित परिस्थितीत वाटा नसल्यास जो तिथं असेल, त्याच्याकडे निर्णय़ घेण्याची ताकद असेल. 

हेसुद्धा वाचा : घटस्फोटानंतर Ex-boyfriend सोबतच्या प्रायव्हेट लाईफबद्दल Kim Kardashian नं केला खुलासा

 

2011 मध्ये सुरु झालेल्या प्रवासाला पूर्णविराम (Kim Kardashian ex husbands)

किम कार्दशियन आणि कान्ये वेस्ट यांच्या नात्याची सुरुवात 2011 मध्ये झाली होती. 2013 मध्ये त्यांनी या नात्यात आपल्या मुलीचं स्वागत केलं आणि 2014 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. कान्येपासून विभक्त होऊन आता घटस्फोटही झाल्यामुळं हा किमचा तिसरा घटस्फोट ठरला आहे. याआधी तिनं Kris Humpheries याच्याशी 2011 मध्ये लग्न केलं होतं. अवघ्या 72 दिवसांतच तिनं या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यापूर्वी ती Damon Thomas याच्यासोबत 2000 ते 2004 या काळात वैवाहिक नात्यात होती.