Good News : कतरिना कैफ आई होणार? समोर आलेल्या व्हिडिओवरुन एकच चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या लेटेस्ट एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत आली आहे.

Updated: Nov 29, 2022, 11:16 PM IST
Good News : कतरिना कैफ आई होणार? समोर आलेल्या व्हिडिओवरुन एकच चर्चा   title=

मुंबई : रणबीर कपूर-आलिया भट्ट आणि बिपासा बसू-करण सिंग ग्रोव्हरचे पालक बनल्यानंतर कतरिना कैफ आणि विक्की कौशलच्या घरातही गुडन्यूज आहे अशी चर्चा आहे कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीची बातमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या लेटेस्ट एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत आली आहे. आता कतरिना कैफच्या नुकत्याच समोर आलेल्या फोटोंमुळे तिच्या गरोदरपणाच्या अफवांना उधाण आलं आहे. हे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहते दावा करत आहेत की, कतरिना कैफकडे गुडन्यूज आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कतरिना कैफ लूज कुर्त्यामध्ये दिसली
अलीकडेच कतरिना कैफच्या लेटेस्ट एअरपोर्ट लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'फोन भूत' फेम अभिनेत्री विमानतळावर लूज-फिटिंग कुर्ता घालून बाहेर पडताच मीडियाने कतरिना कैफ पती विकी कौशलच्या मुलाची आई होणार असल्याचा अंदाज लावला आहे.

साध्या सूटमध्ये कतरिनाने चाहत्यांची मने जिंकली
कतरिना कैफ एका सुंदर लाइट शेड सूटमध्ये दिसली जी तिने केशरी दुपट्ट्यासोबत मॅच केला आहे. तिचा हा प्रवास आरामदायक ठेवण्यासाठी, अभिनेत्री लूज-फिटिंग कुर्त्यामध्ये ग्लॅमरस दिसत होती. कतरिनाचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. नेटिझन्सचे म्हणणं आहे की, कतरिना आणि विकी एक लवकरच एक गुडन्यूज देणार आहेत.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह 4 डिसेंबर 2021 रोजी झाला. लवकरच हे कपल लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. कपलने मालदीवमध्ये वेडिंग एनिव्हर्सरी सरप्राईज प्लॅन केला आहे. वर्क फ्रंटवर बोलायचं झालं तर, कतरिना कैफ अलीकडेच 'फोन भूत' या हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसली होती. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर कतरिना 'टायगर 3' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात सलमान खानसोबत दिसणार आहे. तिचा विजय सेतुपतीसोबतचा 'मेरी ख्रिसमस' हा आणखी एक थ्रिलर चित्रपटही चर्चेत आहे.