मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमीशा पटेलने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
हा वन पीसमधील पार्टी वेअर फोटो ट्विटरवर शेअर केला. आणि लगेच युझर्सनी अमीषा पटेलला ट्रोल केलं. सोडलेले केस आणि लाल लिपस्टिकमध्ये अमीशा पटेलने ब्लॅक ड्रेसमधला हा फोटो शेअर केला. तेव्हा एका युझर्सने, दीदी बच्चे डर जाएंगे असा मचकूर टाकून अमीषाची टेर खेचण्यास सुरूवात केली. तसेच त्याने अमीषाला सवाल देखील विचारला की, कहो ना प्यार हैचा दुसरा पार्ट कधी येत आहे. तर काहींनी म्हटलं की, अमीषा पटेल कायम नशेत असल्यासारखी का दिसते? म्हणजे या ना त्या कारणाने अमीषाला ट्रोल करण्यात आलं.
Have a lovely week tweethearts bisous bisous pic.twitter.com/p0yeetopFb
— ameesha patel (@ameesha_patel) December 18, 2017
अशाप्रकारचे कित्येक ट्विट अमिषाच्या या फोटोला करण्यात आले आहेत. खरं तर पहिल्यांदाच अमिषाच्या फोटोला अशाप्रकारच्या टीकात्मक कॉमेण्ट केल्या जात आहेत असे नाही, तर यापूर्वीही तिच्या अनेक फोटोंचा यूजर्सकडून समाचार घेण्यात आला आहे. सनग्लासेज लावून शॉवर घेत असतानाच्या या फोटोला तर यूजर्सनी प्रचंड ट्रोल केले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अमिषाने लिहिले होते की, ‘शॉवर लाइक ए टॉकस्टार’ वास्तविक अमिषाला ‘शॉवर लाइक अ रॉकस्टार’ असे लिहायचे होते. परंतु यूजर्सनी याच मुद्द्यावरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर अमिषाने तिची ही चूक दुरुस्त केली. हा फोटो अमिषाच्या लेटेस्ट फोटोशूटमधील होता.
बऱ्याच काळानंतर अमिषाने हा फोटो शेअर केला. त्यासदेखील चाहत्यांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया मिळत आहेत. दरम्यान, अमिषा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. मात्र अशातही अमिषा जेव्हा-जेव्हा सोशल मीडियावर स्टेट्स अपडेट करते तेव्हा-तेव्हा चाहते त्यास प्रतिसाद देतात. काही महिन्यांपूर्वीदेखील अमिषाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तिचे क्लीवेज स्पष्टपणे दिसत होते. त्यावरूनदेखील यूजर्सनी उलट-सुलट कॉमेण्ट देत तिला धारेवर धरले होते.