अमिताभ बच्चन यांनी शेअर केले फनी व्हिडिओज...

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Mar 1, 2018, 01:00 PM IST
अमिताभ बच्चन यांनी शेअर केले फनी व्हिडिओज... title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. तो पाहुन तुम्ही नक्कीच चक्रावून जाल.

फनी व्हिडिओज...

या व्हिडिओत एक मुलगी आपल्या आईसोबत उभी आहे. आजूबाजूला कबूतरं दाणे टिपत आहेत. तिच्या आईनेही हातात दाणे धरले आहेत. एक कबूतर येतो आणि तिच्या आईच्या हातातील एक दाणा टिपतो. ती लहान मुलगी त्या कबूतराला पकडते आणि त्याच्या चोचीतील दाणा काढून घेते. अमिताभ यांनाही हा व्हिडिओ पाहुन हसू आवरले नाही.

अमिताभ यांनी ट्वीट केलेल्या अजून एका व्हिडिओत एक तरूण एस्केलेटरच्या साहाय्याने कसा वर चढतो हे पाहणे मजेशीर असणार आहे.

अजून एक व्हिडिओ आहे. ज्यात दोन लहान मुलांची मस्त कैद झाली आहे. हे तीन फनी व्हिडिओ ट्वीट केल्याने बीग बी स्वतः हसून लोकांनाही हसण्यास सांगत आहेत.