अमिताभ बच्चन यांच्या नव्या आलीशान घराची चर्चा, आता सनी लिओनीचे शेजारी

अमिताभ यांची मुंबईतील ही कितवी पॉपर्टी, किंमत ऐकून व्हाल थक्क 

Updated: May 29, 2021, 08:29 AM IST
अमिताभ बच्चन यांच्या नव्या आलीशान घराची चर्चा, आता सनी लिओनीचे शेजारी   title=

मुंबई : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांनी नवं घर खरेदी केलं आहे. अमिताभ बऱ्याच काळापासून आपल्या सर्वात आलीशान घरात म्हणजे 'जलसा' मध्ये राहत होते. आता मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांनी मुंबईत 5184 स्केवअर फूटचं नवं घर खरेदी केलं आहे. (Amitabh Bachchan buys new home; actor chooses duplex apartment in Mumbai worth Rs 31 crore) बिग बी यांचं डुप्लेक्स अपार्टमेंट घेतलं असून हे 27 आणि 28 माळ्यावर आहे. यामध्ये सहा गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था आहे. 

एवढ्या रुपयाला खरेदी केलं घर 

रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी डिसेंबर 2020 साली हे घर खरेदी केलं आहे. याचं रजिस्ट्रेशन एप्रिल 2021 मध्ये झालं आहे. बिग बींनी तब्बल 62 लाख रुपये एवढे या जागेच्या स्टाम्प ड्युटीच्या रुपात भरले आहेत. या संपूर्ण आलिशान घराती किंमत ही एकूण 31 करोड रुपये आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ बच्चन यांची ही प्रॉपर्टी टिअर - 2 बिल्डर क्रिस्टल ग्रुपकडून अटलांटिस प्रोजेक्टमध्ये खरेदी केली आहे. महत्वाचं म्हणजे याच प्रॉपर्टीमध्ये अभिनेत्री सनी लिओनीने 16 करोड रुपयांचं घर घेतलं आहे. तसेच दिग्दर्शक आनंद एल राय यांचं 25.3 करोड रुपयांची प्रॉपर्टी आहे. महाराष्ट्र सरकारने 31 मार्च 2021 नंतर स्टाम्प ड्युटीच्या रक्कमेत 5 टक्के घट करून 2 टक्के केली आहे. याचा फायदा अमिताभ बच्चन यांना झाला आहे.

अमिताभ बच्चन यांच्याकडे किती प्रॉपर्टी?

मुंबईत अमिताभ बच्चन यांचे पाच बंगले आहेत. 10 हजार स्केवर फूटावर असलेल्या अमिताभ यांच्या 'जलसा' बंगल्यात संपूर्ण बच्चन कुटुंबिय राहत आहेत. अमिताभ यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी अमिताभ यांचा पहिला बंगला 'प्रतीक्षा'. त्यानंतर ते 'जलसा' मध्ये शिफ्ट झाले. 'जनक' हा अमिताभ बच्चन यांचा तिसरा बंगला. जेथे अमिताभ बच्चन यांचं ऑफिस आहे. 'वत्स' हा चौथला बंगला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ यांनी हा बंगला एका बँकेला भाड्याने दिला आहे. यासोबतच बिग बींनी 2013 मध्ये जवळपास 60 करोड रुपयांचं एक बंगला खरेदी केला. जो अगदी 'जलसा' च्या मागे आहे. यासोबतच गुरूग्राम आणि फ्रान्समध्ये देखील त्यांचे घर आहे. तसेच प्रयागराजमध्ये एक पारंपरिक, कौटुंबिक घर आहे.