हृतिक रोशनच्या प्रेमात पडलेली श्वेता बच्चन, जवळीक पाहून बिग बींना उचलावं लागलं मोठं पाऊल

या बातम्यांनी सोशल मीडियाचे तापमान वाढले होते.

Updated: Jan 21, 2022, 03:20 PM IST
हृतिक रोशनच्या प्रेमात पडलेली श्वेता बच्चन, जवळीक पाहून बिग बींना उचलावं लागलं मोठं पाऊल title=

मुंबई : बॉलीवूड स्टार हृतिक रोशनचे काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी सुझान खानशी घटस्फोट झाला आहे आणि आता हे दोघेही एकमेकांपासून वेगळे राहताता. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, लग्न झालेलं असून देखील हृतिकचे अनेक अभिनेत्रींसोबत अफेर होतं. अनेक अभिनेत्रींची नावं त्याच्याशी जोडली गेली. ज्यामध्ये करीना कपूर खानपासून ते बार्बरा मोरी, कंगना रणौत यांच्या नावांचा समावेश आहे. पण त्याच्या एका अफेअरबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे.

एकेकाळी हृतिक बॉलीवूडचे बिग बीं अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चनच्याही जवळ आला होता. या बातम्यांनी सोशल मीडियाचे तापमान वाढले होते.

पण नंतर काही दिवसांनी या बातम्या येणं बंद झालं होतं. ज्यावेळेस हृतिक आणि श्वेता जवळ आले होते, त्यावेळेला हृतिकचे लग्न झाले होते. त्यामुळे या दोघांना वेगळं करण्यासाठी बिग बींना मोठा निर्णय घ्यावा लागला होता.

खरंतर एकदा काही प्रसंगामुळे हृतिकला दुखापत झाली होती. त्यावेळी श्वेता तिचा भाऊ अभिषेक बच्चनसोबत हृतिकला भेटायला त्याच्या घरी गेली होती. त्यानंतर अनेकदा अभिषेक नसताना श्वेता हृतिकला एकटी भेटायला जायची. यादरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर विवाहित असूनही श्वेता हृतिकला पसंत करू लागली.

अलीकडे श्वेता बच्चन दिल्लीहून मुंबईत शिफ्ट झाल्याची बातमी आली होती. ज्याबद्दल असे बोलले जात होते की, श्वेता बच्चन आपल्या मुलांना आणि पतीला सोडून अभिनेता हृतिकसोबत अधिक वेळ घालवण्यासाठी दिल्लीहून मुंबईला शिफ्ट झाली आहे.

या बातमीने चांगलाच जोर धरला होता आणि सर्वजण श्वेताच्या अफेअरची चर्चा करू लागले होते. अशा परिस्थितीत बिग बींनी आपल्या मुलीचे वैवाहिक आयुष्य वाचवण्यासाठी एक कल्पना काढली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी हृतिकसोबतचे नाते तोडले आणि त्याला भेटणेही बंद केले. यासोबतच श्वेतालाही त्याच्याकडे जाण्यापासून रोखण्यात आले. अशा परिस्थितीत श्वेता अभिनेत्याला भेटू शकली नाही.

ज्यानंतर श्वेता फक्त तिचा फॅशन डिझायनिंग कोर्स करण्यासाठी मुंबईत शिफ्ट झाली आहे, कारण आता तिला तिच्या पायावर उभे राहायचे आहे, अशी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पसरली.

मात्र, या प्रकरणात किती तथ्य आहे, हे हृतिक किंवा श्वेता बच्चन यांच्याकडूनच कळू शकेल. त्यामुळे या सर्व गोष्टींची पुष्टी करता येत नाही. मात्र या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये फारच चर्चेत आहेत