अमिताभ बच्चन यांच्या नातीनं असं काय केलं? की 'त्या' फोटोची होतेय एकच चर्चा

नैसर्गिक रंग लपवत नसल्याची प्रशंसा केली.

Updated: Jan 26, 2022, 05:18 PM IST
 अमिताभ बच्चन यांच्या नातीनं असं काय केलं? की 'त्या' फोटोची होतेय एकच चर्चा title=

मुंबई : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा अलीकडेच तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली. नव्या ही अमिताभ यांची लेक श्वेता यांची मुलगी आहे. तिने मागील वर्षीच पदवी मिळवली आहे. ती सोशल मीडियावर कमालीची चर्चेत असते.

नव्या नवेली नंदाने अभिनयाचे क्षेत्र निवडले नसले तरी ती चर्चेत राहिली आहे. अलीकडेच तिने सुंदर फोटो शेअर केला आहे. त्याच्यासोबतच पांढरे केस असल्याचे दाखवत आहे. नव्याचे हे फोटोज चर्चेत आहेत. तिने केसांचा नैसर्गिक रंग लपवत नसल्याची प्रशंसा केली.

तिच्या या फोटोंमध्ये पांढरे केस दिसत होते. स्वतः नव्याने कॅप्शनमध्ये तिच्या पांढर्‍या केसांचा उल्लेख केला आहे. याआधीही नव्याने असे फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिचे केस पांढरे दिसत होते. मात्र, तिच्या सुंदर चेहऱ्यासमोर तिच्या केसांकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. 

Amitabh Bachchan's granddaughter Navya Naveli Nanda flaunts white hair |  अमिताभ की नातिन ने शेयर की अनफिल्टर्ड फोटो, 25 साल की नव्या नवेली ने नहीं  छिपाए सफेद बाल - NewsJoJo

यापूर्वी तारक मेहताच्या जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्या मुलीचे फोटोही चर्चेत होते. नियतीने तिच्या लग्नात केसांना रंग दिला नाही. दुसरीकडे, नेहा धुपिया तिच्या राखाडीकेसांना लकी चार्म मानते.

मात्र, नव्याने असे फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही ज्यामध्ये तिचे पांढरे केस दिसत आहेत. याआधीही त्याने अनेकदा असे फोटो शेअर केले आहेत ज्यात तिचे एक-दोन केस पांढरे झाले आहेत.