मुंबई : विनोदवीर राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) आज चाहत्यांना पोरकं करून गेले. चाहत्यांना आपल्या अभिनयाने भरभरुन हासवणाऱ्या राजू यांच्या निधनाने प्रत्येकाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से आहेत, जे आजही चर्चेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांचा साधेपणा. राजू श्रीवास्तव यांचा साधेपणा प्रत्येक कार्यक्रमात दिसला. फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार राजू यांचे चाहते आहेत, पण राजू मात्र महानायक अभिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे चाहते होते.
राजू यांचा असा एकही कार्यक्रम नाही, ज्याठिकाणी त्यांनी आपल्या आयुष्यातील बिग बींचं महत्त्व सांगितलं नाही. एवढंच नाही तर, राजू यांनी बिग बी आणि बच्चन कुटुंबावर अनेकदा मिमिक्री केली. (Amitabh Bachchan role in Raju Srivastav life)
राजू यांनी मिमिक्री (Raju Srivastav Mimicry) केल्यानंतरही अमिताभ बच्चन यांनी कधीच आक्षेप घेतला नाही, एका अवॉर्ड शोदरम्यान राजू श्रीवास्तव अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत म्हणाले होते, बिग बी तुम्ही आमचे अन्नदाता आहात, तुमची नक्कल करून मी माझं घर चालवतो....'
राजू यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचा साधेपणा सर्वांसमोर आला. राजू श्रीवास्तव यांना अमिताभ बच्चन यांचा विशेष स्नेह लाभला. बिग बींना जेव्हा राजू यांच्या प्रकृतीबद्दल कळलं, तेव्हा अमिताभ यांनी राजू यांच्या रुग्णालयात ऑडिओ मेसेज पाठवला. (Amitabh Bachchan audio massage to Raju Srivastav)
दरम्यान, बिग बींचा मेसेज, चाहते आणि कुटुंबाची प्रार्थना, डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले. संपूर्ण जगाला आपल्या विनोदाने हासवणाऱ्या विनोदवीराचं वयाच्या 59 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.