Raju Srivastava Net Worth : 'गजोधर भैय्या' म्हणून कलाजगतात लोकप्रिय असणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी आज (21 सप्टेंबर 2022) जगाचा निरोप घेतला. कित्येक दिवसांपासून मृत्यूशी सुरु असणारी झुंज अखेर ते हरले आणि मनाला चटका लावत त्यांनी एक्झिट घेतली (Raju Srivastav Death). संघर्षाच्या दिवसांतून पुढे आलेल्या श्रीवास्तव यांनी कायमच त्यांच्या मनाच्या श्रीमंतीनं चाहत्यांची मनं जिंकली. त्यांच्यात दडलेला सर्वसामान्य माणूस कायमच एका सेलिब्रिटीवर उजवा ठरत होता.
मेहनतीच्या बळावर नावारुपास आलेल्या या कलाकारानं आज मुलीसाठी आणि पत्नीसाठी कोट्यवधींची संपत्ती मागे ठेवलीये. सूत्रांच्या माहितीनुसार श्रीवास्तव एका स्टेज शोसाठी जवळपास 4 ते 5 लाख रुपये इतकं मानधन घेत होते. काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार त्यांचं वार्षिक उत्पन्न 20 कोटी रुपये इतकं आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीचा एकूण आकडा किती याचा अंदाज आलाच असेल. दरम्यान, कानपूरमध्ये श्रीवास्तव यांचं स्वत:चं घरही आहे.
(RIP Raju Srivastav) राजू श्रीवास्तव यांना Cars ची प्रचंड आवड. त्यांच्या कारच्या ताफ्यामध्ये इनोवा, बीएमडब्लू 3 आणि ऑडी क्यू7 यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.
कारकिर्दीबाबत थोडं....
राजू श्रीवास्तव यांना 'द ग्रेट इंडियन लॉफ्टर चॅलेंज'च्या पहिल्या पर्वातून खरी प्रसिद्धी मिळाली. या शोमुळेच ते घराघरात पोहचले. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यासी संधी त्यांना मिळाली. 'बाजीगर' (Baazigar), 'बॉम्बे टु गोवा' (Bombay to Goa), 'आमदनी अठन्नी खर्चा रुपया' (Aamdani Atthanni Kharcha Rupaiya)यासारख्या सिनेमांमध्ये ते झळकले. यानंतर राजू 'बिग बॉस'च्या तिसऱ्या पर्वातही सहभागी झाले होते.