अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत नानावटी रुग्णालयाकडून माहिती

बिग बींच्या प्रकृतीची अधिकृत माहिती 

Updated: Jul 12, 2020, 07:29 AM IST
अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत नानावटी रुग्णालयाकडून माहिती

मुंबई : अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी त्यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. अमिताभ यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं ट्विटवरून सांगितलं. आता नानावटी रुग्णालयाकडून अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीतबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. 

अमिताभ बच्चन यांची प्रकृती आता व्यवस्थित आहेत. अमिताभ यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. रूग्णालयाच्या अलगीकरणाच्या विभागात अमिताभ यांना ठेवण्यात आलं आहे. अशी माहिती नानावटी रूग्णालयाच्या अधिकृत व्यक्तींकडून देण्यात आली आहे. अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव

 तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील शनिवारी रात्री स्वतः बिग बींच्या तब्बेतीबाबत माहिती दिली आहे. (अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती)  

अमिताभ बच्चन हे ७८ वर्षांचे आहेत. ७८ वर्षीय अमिताभ यांना यकृताचा आजारासह इतर अनेक आजार आहेत. यात आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यामुळे त्यांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. पण आपल्या सर्वांना माहितच आहे, आताच्या कलाकारांना लाजवेल असं बिग बी यांच राहणीमान आहे. योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम हे अमिताभ बच्चन करतच असतात.