'छोड कर चले जाते हैं...' Amitabh Bachchan यांच्या कुटुंबातील खास सदस्यानं घेतला अखेरचा श्वास

अनेकांना जगण्याची नवी दिशा दाखवणाऱ्या बिग बींवर दुखाःचा डोंगर... 'छोड कर चले जाते हैं...'  

Updated: Nov 17, 2022, 10:46 AM IST
'छोड कर चले जाते हैं...' Amitabh Bachchan यांच्या कुटुंबातील खास सदस्यानं घेतला अखेरचा श्वास title=

Amitabh Bachchan New Post : कुटुंब म्हणजे जगातील सर्वात मोठा आधार. म्हणून प्रत्येकाच्या चांगल्या-वाईट दिवसांत कुटुंब कायम सोबत असतं. पण कुटुंबातील एक सदस्य जरी आपल्याला सोडून गेला, तर ते दुखः डोंगरा एवढं मोठं असतं. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्या कुटुंबातील एका सदस्याने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. बिग बींनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत दुखः वाटलं आहे. सध्या बिग बींची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (amitabh bachchan pet dogs) 

बच्चन कुटुंबातील खास सदस्यानं घेतला अखेरचा श्वास

अमिताभ बच्चन यांचा पेट (amitabh bachchan pet dog) आता या जगात नाही. बच्चन कुटुंबातील पाळीव कुत्र्याचं निधन झालं आहे. त्याच्यासाठी बिग बींनी एक पोस्ट शेअर केली आहे. फोटोमध्ये बिग बींसोबत त्यांचा पेट देखील दिसत आहे. सध्या बिग बींची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (amitabh bachchan dog die)

फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये, 'माझा सर्वात लहान मित्र... फार कमी वेळासाठी|| नंतर मोठे होतात आणि एक दिवस सोडून निघून जातात....' अशी भावुक पोस्ट अमिताभ बच्चन यांनी केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बिग बींच्या पोस्टवर कमेंट
एका युजरने बिग बींच्या पोस्टवर कमेंट केली आहे. 'ते आपल्या आयुष्यात फार कमी कालावधीसाठी असतात. पण आपण शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या सोबत असतो. त्यामूळे त्यांना आनंदी ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा...' अशी कमेंट एका युजने केली. 

फक्त सर्वसामान्यच नाहीचर सेलिब्रिटींच्या घरी देखील पेट असतात. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या पेटसोबत बाहेर फिरताना देखील दिसतात. पण त्यांनी अचानक जगाचा निरोप घेतल्यावर कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळतो.

अमिताभ बच्चन यांचे आगामी सिनेमे 
नुकताच बिग बींचा (amitabh bachchan full movies) 'उंचाई' सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर देखील घेतलं. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने मोठी मजल मारली आहे. सिनेमात बिग बीं शिवाय नीना गुप्ता, बोमन ईरानी, अनुपम खेर, सारिका यांसारखे मोठे कलाकार आहेत. (amitabh bachchan songs)