जेव्हा रेखा यांनी अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी जया बच्चन यांना दिला होता चकवा

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक प्रसिद्ध कपल आहेत, 

Updated: Feb 13, 2022, 09:30 PM IST
जेव्हा रेखा यांनी अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी जया बच्चन यांना दिला होता चकवा  title=

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक प्रसिद्ध कपल आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी. ही जोडीने केवळ रुपेरी पडद्यावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही चर्चेत होती.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. अमिताभ बच्चन यांनी त्यांचं रेखा यांच्यावरील प्रेम कधीच मीडियासमोर मान्य केलं नाही. तरीदेखील रेखा यांनी  बीग बी यांच्याबद्दलचं प्रेम अनेकदा व्यक्त केले होतं. त्याचवेळी जया बच्चन यांना जेव्हा रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या जवळीकीची माहिती मिळाली तेव्हा त्यांना खूप राग आला.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जया यांनी अमिताभ यांना रेखासोबत कोणत्याही चित्रपटात काम करणार नसल्याचं सांगितलं होतं. दुसरीकडे रेखा आपलं पाऊल मागे घेण्यास तयार नव्हत्या. त्यांच्याशी संबंधित एक  किस्सा देखील आहे. जेव्हा 'कुली' चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक मोठा अपघात झाला आणि त्यांना बराच काळ मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात राहावं लागलं. बच्चन कुटुंबासाठी तो काळ खूप कठीण होता. त्यादरम्यान, बिग बींचे ओळखीचे आणि मित्र त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला यायचे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  रेखा यांनाही अमिताभ बच्चन यांना भेटायचं होतं. त्याचबरोबर जया यांनी अमिताभ यांच्या खोलीजवळ कडेकोट सुरक्षा व्यवस्था लावली होती. पण रेखा यांनी हार मानली नाही. पांढरी साडी नेसून, हातात फुलांची टोपली घेऊन फुलवाली बनून त्या सकाळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. त्यावेळी रेषा यांना कोणालाच ओळखता आलं नाही. त्यानंतर अभिनेत्रीने अमिताभ यांना दुरून पाहिलं आणि तिथूनच त्या परतल्या. नंतर जया यांना ही खबर मिळाली.