Amitabh Bachchan's Letter to Nimrat Kaur : बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर अभिषेक, ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबातील कोणत्या व्यक्तीनं प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, या सगळ्यात अमिताभ बच्चन यांनी लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतंय. हे पत्र अमिताभ यांनी निम्रत कौरसाठी लिहिलं होतं. या पत्रात अमिताभ यांनी निम्रतची स्तुती केली आहे.
महत्त्वाची गोष्ट ही आहे की बिग बींनी लिहिलेलं हे पत्र दोन वर्ष जूनं आहे. हे पत्र निम्रत कौरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलं होतं. हे पत्र शेअर करत निम्रतनं एक खास पोस्ट देखील लिहिली होती. या पत्रात अमिताभ यांनी निम्रतचा दसवी या चित्रपटातील अभिनयाची स्तुती केली आहे. त्या पत्रात अमिताभ यांनी निम्रतच्या अभिनयातील छोट्या छोट्या गोष्टींचा उल्लेख केला, त्यात तिचे हाव-भाव आणि सगळं काही. तिच्या अभिनयाची स्तुती करत त्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
अमिताभ यांचं हे पत्र शेअर करत निम्रतनं कॅप्शन दिलं की '18 वर्षांपूर्वी जेव्हा मी मुंबईत पाऊल ठेवलं होतं. तेव्हा हा विचार मनातही आला नव्हता की अमिताभ बच्चन हे माझ्या नावानं मला ओळखतील आणि आमच्या भेटीला आठवतील आणि टिव्हीवर येणाऱ्या जाहिरातीतील माझ्या अभिनयाची स्तुती करतील. त्यानंतर अनेक वर्षानंतर एका चित्रपटातील मी केलेल्या प्रयत्नांवर एक पत्र आणि फूलं पाठवतील. हे सगळं माझ्यासाठी कधी पूर्ण होईल अशी आशा नसलेलं स्वप्न होतं, अगदी दुसऱ्याचं कोणाचं असेल, माझ्या जवळच्या व्यक्तीनं देखील स्वप्नात हा विचार केला नसेल. अमिताभ सर तुम्हाला खूप प्रेम आणि धन्यवाद. आज शब्द आणि भावना, दोन्ही कमी पडल्या आहेत. तुमचं हे पत्र माझ्यासोबत कायम स्वरूपी राहणार आणि मला प्रेरित करत राहिल. तुमच्या आशीर्वादासाठी आभारी आहे. तुम्ही दिलेल्या या शाबासकीनं एक शांतता जाणवत आहे... जशी एका भलामोठा पर्वत किंवा प्राचीन मंदिराच्या समोर येते. मी कायम आभारी राहिन.'
हेही वाचा : 'चहा पाजायचे पण काम देत नव्हते', विकी कौशलच्या वडिलांनी सांगितला मुलाचा संघर्ष, निंदा आणि नकार केला सहन
'दसवी' या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटात अभिषेक बच्चन, निम्रत कौर या दोघांशिवाय यामी गौतम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन तुषार जलोटानं केलं होतं.