KBC च्या एका एपिसोडसाठी अमिताभ घेतात किती कोटी?

अमिताभ बच्चन यांची एका एपिसोडसाठीची फी किती?

Updated: Oct 4, 2018, 02:48 PM IST
KBC च्या एका एपिसोडसाठी अमिताभ घेतात किती कोटी?

मुंबई : बॉलिवूडचे शंहशाह अमिताभ बच्चन यांच्याद्वारे होस्ट केला जाणार सर्वात लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती' पुन्हा एकदा सुरु झाला आहे. घराघरात पाहिला जाणारा हा शो बिग बी यांच्या होस्टींगमुळे देखील तितकाच महत्त्वाचा बनतो. बिग बी यंदा शोचं 10वं सीजन होस्ट करत आहेत.

यंदा फी वाढवली

यंदाच्या सीजनसाठी अमिताभ बच्चन यांनी त्यांची फी वाढवली आहे. अमिताभ बच्चन यांनी 200 कोटींची डील यासाठी साईन केली आहे. मागच्या सीजनमध्ये 75 एपिसोड झाले होते. एका एपिसोडसाठी अमिताभ बच्चन 2.6 कोटी रुपये रुपये घेत होते. पण यंदाच्या सीजनसाठी ते 3 कोटी रुपये घेणार आहेत.

यंदाच्या सीजनमध्ये किती एपिसोड होणार आहेत याबबात अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.