KBC 16 च्या एका एपिसोडसाठी अमिताभ बच्चन 3-4 कोटी नाही तर घेतात तब्बल इतके कोटी!

KBC 16 Amitabh Bachchan Fees : अमिताभ बच्चन हे 'कौन बनेगा करोडपति 16' च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात माहितीये...

दिक्षा पाटील | Updated: Aug 14, 2024, 12:41 PM IST
KBC 16 च्या एका एपिसोडसाठी अमिताभ बच्चन 3-4 कोटी नाही तर घेतात तब्बल इतके कोटी!  title=
(Photo Credit : Social Media)

KBC 16 Amitabh Bachchan Fees : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन हे सध्या 'कौन बनेगा करोडपति 16' चं सुत्रसंचालन करताना दिसत आहेत. या शोची सुरुवात 2000 मध्ये झाली आहे. तेव्हा पासूनच त्यांच्या चाहत्यांना त्यांना किती मानधन मिळतं हे जाणून घेण्याची इच्छा होते. 24 वर्षांपासून सुरु असलेल्या या शोची आजही क्रेझ आहे. प्रत्येक सीझनची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत असतात. जसं नवीन सीझन येतं तशी मानधनाची रक्कम वाढते. 

मनी कंट्रोल रिपोर्टनुसार, चौथ्या सीझनपर्यंत अमिताभ बच्चनच्या मानधनाची रक्कम दुप्पट झाली होती. अमिताभ बच्चन यांचं प्रत्येक सीझनचं मानधन...

  • KBC 1 – 25 लाख
  • KBC 2 – 25 लाख
  • KBC 4 – 50 लाख
  • KBC 5 – 50 लाख
  • KBC 6 – 1.5 कोटी ते 2 कोटींच्यामध्ये
  • KBC 7 – 1.5 कोटी ते 2 कोटींच्यामध्ये
  • KBC 8 – 2 कोटी
  • KBC 9 – 2.9 कोटी
  • KBC 10 – 3 कोटी
  • KBC 11 – 3.5 कोटी
  • KBC 12 – 3.5 कोटी
  • KBC 13 – 3.5 कोटी
  • KBC 14 – 4 आणि 5 कोटींच्यामध्ये
  • KBC 15 – 4 आणि 5 कोटींच्यामध्ये
  • KBC 16 – 5 कोटी

अमिताभ बच्चन हे त्यांच्या करिअरमध्ये खूप खाली जात होते. तेव्हा त्यांना या शोची ऑफर मिळाली होती. अशात त्यांनी हा शो करण्यास होकार दिला. हा शो ब्रिटिश शो होता ज्याचं नाव Who Wants To Be A Millionaire? असं होतं. त्यानंतर अमिताभ बच्चन हे घराघरात पोहोचले आणि पुन्हा एकदा त्यांचं करिअर हे ट्रॅकवर येऊ लागलं. त्याच वर्षी अमिताभ बच्चन हे 'मोहब्बते' या आदित्य चोप्रा यांच्या चित्रपटात दिसले. याशिवाय या शोनंतर अमिताभ यांची लोकप्रियता ही चांगलीच वाढली होती. 

 हेही वाचा : 'ऐश्वर्या माझी मुलगी नाही, तर...', जया बच्चन यांनी सांगितला होता लेक-सुनेतील फरक

दरम्यान, इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, जया बच्चन यांनी जेव्हा 2022-23 चं निवडणूक प्रतिज्ञापत्र लिहिलं तेव्हा त्यांची एकूण संपत्ती ही 1,63,56,190 रुपये होती. तर त्यांचे पती अर्थात अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती ही 273,74,96,590 होती