Jaya Bachchan On Difference Between Daughter and Daughter in Law : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही काळापासून ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये काही ठीक नाही. या सगळ्यात जया बच्चन यांचं एक वक्तव्य खूप चर्चेत आलं आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नात ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन एकत्र पोहोचले नव्हते. ज्यानंतर अशा बातम्या येऊ लागल्या की ते दोघं कधीही घटस्फोट घेऊ शकतात. खरंतर आता स्वत: अभिषेकनं या अफवा असल्याचं म्हटलं आणि त्याच्या लग्नाची अंगठी दाखवली. आता जया बच्चन यांचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जया बच्चन या नेहमीच त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. त्या नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात जया बच्चननं लेक आणि सूनेत असलेलं अंतर यावर बोलताना दिसत आहेत. त्यासोबत त्यांनी ऐश्वर्या रायविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
जया बच्चन यांनी सांगितलं की 'लेक आणि सूनेत खूप फरक असतो. माझं म्हणणं आहे की मुली आई-वडिलांना जास्त आदर करत नाही. मुलगी ही नेहमीच आई-वडिलांना गृहीत धरते. पण सासरच्यांसोबत तुम्ही तसं करत नाही. काळानुसार, मुली त्यांच्या सासरी एडजस्ट होतात. आज मी स्वत: भादुडी पेक्षा स्वत: ला बच्चन समजते.'
जया बच्चन यांनी पुढे सांगितलं की 'त्या नेहमीच त्यांच्या दोन्ही मुलांसाठी शिस्त प्रिय आई राहिल्या आहेत. त्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की ऐश्वर्यासोबत देखील त्या तशाच आहेत का? तर त्यावर उत्तर देत जया बच्चन म्हणाल्या, ऐश्वर्या राय माझी मुलगी नाही सून आहे. मला तिच्यासोबत शिस्त प्रिय किंवा कठोर राहण्याची काही गरज नाही. मला या गोष्टीवर विश्वास आहे की तिची आई तिच्यासोबत शिस्तप्रिय वागली असेल.'
हेही वाचा : नाग चैतन्य Move On झाल्यानंतर समांथाच्या आयुष्यातही नवा पुरुष? डायरेक्टरबरोबर रिलेशनमध्ये?
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचं लग्न 2007 मध्ये झालं होतं. लग्नाच्या चार वर्षात त्यांना एक मुलगी झाली असून आराध्या असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. ऐश्वर्या नेहमीच तिची लेक आराध्यासोबत दिसते. त्याशिवाय ती तिच्या सासरच्या लोकांसोबत खूप कमी वेळा दिसते. रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही काळापासून ऐश्वर्याच्या बच्चन कुटुंबात वाद सुरु आहेत. दरम्यान, यावर अभिषेकनं काहीही वक्तव्य केलेलं नाही.