धर्मेंद्र यांची एक चूक आणि अमिताभ बच्चन यांचा जीव थोडक्यात बचावला, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचा 'शोले' चित्रपट हा खूप हिट ठरला. या चित्रपटातील प्रत्येक दृश्य परिपूर्ण करण्यासाठी कलाकारांनी खूप मेहनत घेतली होती. मात्र, यामध्ये धर्मेंद्र यांनी अशी चूक केली, ज्याची किंमत अमिताभ बच्चन यांच्या जीवावर बेतू शकत होती.

Soneshvar Patil सोनेश्वर पाटील | Updated: Sep 22, 2024, 02:14 PM IST
धर्मेंद्र यांची एक चूक आणि अमिताभ बच्चन यांचा जीव थोडक्यात बचावला, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर title=

Dharmendra Fired Real Bullets: 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शोले' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या ह्रदयावर एक वेगळीच छाप पाडली होती. या चित्रपटातील जय-वीरुची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटाचा प्रत्येक सीन परिपूर्ण करण्यासाठी कलाकारांनी देखील खूप मेहनत घेतली होती. 

ज्यामध्ये 'शोले'च्या क्लायमॅक्स सीनमध्ये गब्बर सिंगच्या कैदेतून सुटल्यानंतर वीरू तिथून निघताना बंदूक उचलतो असे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर तो बॉक्सला लाथ मारतो. त्यामधील गोळ्या तो खिशात भरतो. ही दृश्ये अगदी खरी वाटावीत म्हणून चित्रपटाच्या अॅक्शन दिग्दर्शकाने खऱ्या बुलेटचा वापर केला होता. यावेळी धर्मेंद्र यांना अनेक वेळा रिटेक घ्यावे लागले. यामुळे त्यांनी रागात हवेत गोळीबार केला. जो अमिताभ बच्चन यांच्या अगदी जवळून गेला. 

अमिताभ बच्चन यांच्याकडून खुलासा

अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती शोच्या एका एपिसोडमध्ये या सीनबद्दल खुलासा केला होता. त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही जेव्हा तो सीन शूट करत होतो. तेव्हा धर्मेंद्रजी खाली होते आणि मी टेकडीवर होतो. त्यावेळी धर्मेंद्र यांनी पेटी उघडली आणि त्यामधून दारुगोळा बाहेर काढला. त्यावेळी ते अनेकदा गोळ्या उचलण्यात अयशस्वी झाले. त्यानंतर धर्मेंद्रजी खूप चिडले. 

त्यानंतर अमिताभ बच्चन म्हणाले की, धर्मेंद्र यांना योग्य गोळी न मिळाल्याने तो इतका चिडला की त्याने गोळ्या झाडायला सुरुवात केली. मी टेकडीवर उभा असताना माझ्या कानाजवळून गोळी गेली. त्यावेळी मला हूश आवाज आला. त्याने खरी गोळी झाडली होती. मी थोडक्यात वाचलो. चित्रपटादरम्यान अशा अनेक घटना घडल्या आणि शोले खरोखरच एक खास चित्रपट ठरला.