सवतीशी भांडायला थेट सेटवर पोहोचली होती अमृता सिंग, अशी होती करिनाची रिअ‍ॅक्शन

आज अभिनेत्री अमृता सिंह तिचा वाढदिवस साजरा करत आहे. एककाळ असा होता की, तिचा चाहतावर्ग खूप मोठा होता. मात्र तुम्हाला माहितीये का? की, या अभिनेत्रीचा सामना करिना कपूरसोबत झाला होता. जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

Updated: Feb 9, 2024, 08:05 AM IST
सवतीशी भांडायला थेट सेटवर पोहोचली होती अमृता सिंग, अशी होती करिनाची रिअ‍ॅक्शन title=

मुंबई : 80 च्या दशकात सगळ्यात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेली अभिनेत्री अमृता सिंह आज ९ फेब्रुवारीला तिचा वाढदिवस साजरा करत आहे. १९८३ साली बेताब सिनेमातून करिअरला सुरुवात करणारी अमृताने 'मर्द', 'चमेली की शादी', 'खुदगर्ज' सारखे सुपरहिट सिनेमात काम केलं होतं. एक काळ असा होता जेव्हा इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रीच्या नावाचा जोरदार बोलबाला होता. मात्र आता अभिनेत्रीने  सिनेसृष्टीतून एक्झिट घेतली आहे. मात्र अमृता जितकी तिच्या प्रोफशनल लाईफमुळे चर्चेत असते तितकीच चर्चेत ती तिच्या पर्सनल लाईफमुळेही असते. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमीत्त असा एक किस्सा सांगणार आहोत जो त्यावेळी चांगलाच गाजला होता.
 
खूप चर्चेत होती अमृता आणि सैफचं नातं
सैफ अली खानसोबत अमृताचं नातं खूप चर्चेत होतं. मग त्या दोघांचं लग्न असो की मग त्यांचा घटस्फोट असो. या दोघांचं नातं एकेकाळी इतकं बिघडलं की, हे नातं कोणापासूनच लपून राहिलं नाही. मात्र आता दोघंही आप-आपल्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत. मात्र हे फारच कमी लोकांना माहिती आहे की, अमृता सिंह आणि करिना कपूर एकमेकींना भेटल्या होत्या.

करिनाला भेटायला जेव्हा सेटवर पोहचली होती अमृता सिंह
हा किस्सा आहे २००१ सालचा. जेव्हा करण जोहरचा सुपरहिट सिनेमा 'कभी खुशी कभी गम'च्या शूटिंग दरम्यानचा आहे. या गोष्टीचा खुलासा करत स्वत: करिना कपूरने 'कॉफी विद करण' या चॅट 
शोमध्ये केला होता. यावेळी बोलताना तिने सांगितलं होतं की, सारा अली खान माझी खूप मोठी चाहती होती. तिला माझं पू कॅरेक्टर खूप आवडलं होतं. सिनेमाच्या ट्रायल दरम्यान ती तिची आई अमृतासोबत मला भेटण्यासठी माझ्या सेटवर आली होती. ती मला पाहून अमृताच्या मागे लपली होती. अमृताला वाटत होतं की, मी सारासोबत एक फोटो क्लिक करावा. 
 
सैफच्या मुलांसोबत असं आहे करिनाचं बॉन्डिंग
याचबरोबर करिनाने अमृतासोहतच्या आपल्या बॉण्डिंगविषयी बोलताना सांगितलं होतं की, आम्ही एक परिवारासारखं राहतो. ही पहिली आणि शेवटची वेळ होती जेव्हा करिनाने अमृतासोबत भेट घेतली. मात्र करिना सैफ आणि अमृताच्या मुलांसोबत सारा आणि इब्राहिमसोबत खूप छान बॉन्डिंग शेअर करते. इतकंच नव्हेतर करिना अनेकदा सारा आणि इब्राहिमसोबतचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर करते.