सैफमुळे अमृता सिंग गमावणार होती जीव; साराकडून मोठा खुलासा

 सैफच्या त्या कृत्यामुळे अमृता गमावणार होती जीव

Updated: Oct 2, 2021, 01:04 PM IST
सैफमुळे अमृता सिंग गमावणार होती जीव; साराकडून मोठा खुलासा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अनेकदा वडील सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्यातील नात्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसते.  नुकताचं तिने 'फिट अप व्हिथ द स्टार्स सीझन 2' मध्ये पोहोचली होती. यावेळी साराने तिच्या आईच्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टींचा खुलासा केला. साराने तिच्या आई-वडिलांबद्दल एक किस्सा सांगितला. जेव्हा सैफमुळे अमृताला बंदूकीची गोळी लागणार होती. पण एका वाक्यामुळे अमृताचा जीव वाचला. 

सारा म्हणाली, 'जेव्हा माझ्या आई-वडिलांचं लग्न झालं. तेव्हा त्यांनी चेहऱ्याला बूट पॉलिश लावून त्यांची कॉमनफ्रेन्ड नीलू मर्चेंडला घाबरवण्याचं ठरवलं. पण शेवटच्या क्षणी माझ्या वडिलांमुळे पुर्ण डाव कोलमडला आणि वडिलांनी आईला नीलू मर्चेंडच्या रूममध्ये ठकललं... आणि रूमचा दरवाजा बाहेरून बंद केला... '

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे सारा म्हणाली, 'आई ज्यावेळी नीलू मर्चेंडच्या रूममध्ये गेली, तेव्हा नीलू तिच्या पतीसोबत होती. त्यावेळी त्यांना वाटलं रूममध्ये कोणी घुसलं आहे. तेव्हा तिच्या पतीने माझ्या आईला गोळी घातलीचं असती, पण तेवढ्यात आई म्हणाली, 'डोन्ट शूट इट्स डिग्गी...'' या एका वाक्यामुळे ती सध्या साराने तिच्या आई-वडिलांबद्दल केलेला हा खुलासा तुफान व्हायरल होत आहे.