Amruta Deshmukh and Seema Haider: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवाथे यांची. त्यांचे लग्न ठरले आहे आणि त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. यावेळी सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे ती म्हणजे त्यांच्या केळवणाची. काही दिवसांपुर्वी त्यांचा साखरपुडा संपन्न झाला होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटोही सर्वत्र व्हायरल झाले होते. आता त्यांच्या केळवणाचे फोटो व्हायरल झाले आहेत. याचा अर्थ लवकरच त्यांचा विवाहसोहळा हा संपन्न होणार आहे. सध्या त्यांच्या या केळवणाचे फोटो हे सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत. अमृता देशमुख ही एक टेलिव्हिजन अभिनेत्री असून ती सोशल मीडियावरही फारच चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. सोबतच प्रसादही एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्यानं अनेक मराठी हिंदी मालिका आणि चित्रपटांतून कामं केली आहेत.
अमृता आणि प्रसाद यांची बिग बॉस मराठी S4 पासून ओळख झाली होती. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली होती. तेव्हापासून त्यांच्या प्रेम प्रकरणाला सुरूवात झाली होती. बिग बॉस मराठीतून बाहेर आल्यानंतर त्या दोघांचीही बरीच चर्चा रंगलेली होती. आताही त्यांची जोरात चर्चा आहे. अमृता देशमुखनं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून केळवणाचे फोटो हे पोस्ट केले आहे. यावेळी अमृताच्या घरच्यांकडून या केळवणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिच्या या केळवणाचे फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत. या खास दिवशी अमृतानं खास उखाणा घेतला आहे. आपले फोटो शेअर करताना त्यानं लिहिलं आहे की, ''चांदीच्या ताटात पुरणपोळी... पुरणपोळीमध्ये जायफळ... प्रसादचं नाव घेतेय देशमुखांचं शेंडेफळ ! केळवण by Deshmukhs!''
सध्या तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगेलली आहे. यावर सेलिब्रेटींच्या भन्नाट कमेंट्स येत आहेत. यावेळी तिचा सख्खा भाऊ तिच्या केळवणाला उपस्थित राहू शकला नव्हता. त्यामुळे मी मिस केलं असं लिहिलं आहे. तर हर्षदा खानविलकर हिनं लिहिलंय की, 'आमची सुनबाई खूप सुंदर'. अभिजित खांडकेकर आणि प्रार्थना बेहेरे यांनीहीदेखील त्यांच्या या केळवणाच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. यावेळी अमृतानंही फार सुंदर साडी नेसली होती. त्याचसोबत त्यांची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली होती. यावेळी संपुर्ण कुटुंब हे आनंदात दिसत होते.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.