रवी शास्त्रीच्या प्रेमात वेडी होती अमृता सिंह, लग्न करणार होते पण क्रिकेटरच्या एका अटीने तुटलं नातं

अमृता सिंह आणि रवी शास्त्री एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. लग्नबंधनातही अडकणार होते पण रवी शास्त्री यांच्या एका अटीने लग्न मोडलं. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 26, 2024, 09:14 AM IST
रवी शास्त्रीच्या प्रेमात वेडी होती अमृता सिंह, लग्न करणार होते पण क्रिकेटरच्या एका अटीने तुटलं नातं title=

बॉलिवूडमधील अशा अनेक लव्ह स्टोरी आहेत ज्या पूर्ण झाल्याच नाहीत. पण त्यांच्या प्रेमाची चर्चा मात्र कायमच होत राहते. अशीच एक स्टोरी आहे अमृता सिंग आणि रवी शास्त्रीची. दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. अगदी लग्नाचा विचारही सुरु झाला. पण त्यावेळी रवी शास्त्रीची एक अट मध्ये आली. यामुळेच त्यांचं नातं तुटलं. अमृता सिंग या नात्याच्या विरहामुळे अतिशय हैराण झाली होती आणि तिने त्याचवेळी सैफ अली खानसोबत लग्न केलं. 

अशी झाली पहिली भेट

रवी शास्त्री आणि अमृता सिंग यांची भेट एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. या मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले ते कळलेच नाही. काही काळ डेट केल्यानंतर दोघांनीही आपल्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला होता. रवी आणि अमृता लग्न करणार होते पण शेवटच्या क्षणी त्यांचे नाते तुटले.

या कारणामुळे विवाह होऊ शकला नाही

रवी शास्त्री यांनी अमृता सिंगसमोर अट ठेवली होती की, लग्नानंतर चित्रपटात काम करणार नाही. अमृताला ही अट मान्य नव्हती. दोघांनीही यावर खूप चर्चा केली पण तोडगा निघाला नाही आणि अमृताने आपल्या करिअरला प्राधान्य देत नाते तोडले. नाते तुटल्यानंतर अमृताला खूप अस्वस्थ वाटू लागले. अशा परिस्थितीत त्यांनी स्वत:ला कामात खूप व्यग्र केले होते.

फोटो झाला व्हायरल

सध्या सोशल मीडियावर अमृता सिंग आणि रवी शास्त्री यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघं जुळे होताना दिसत आहेत. दोघांनी निळ्या रंगाचे पोशाख परिधान केले आहेत आणि हात धरून पोज देताना दिसत आहेत. अमृता आणि रवीच्या फोटोंवर चाहतेही भरपूर कमेंट करत आहेत. फोटो पाहून सर्वजण म्हणत आहेत की, ही तरुणपणी सारा अली खान अशी दिसत होती. सारा तिच्या आईसारखीच दिसते.