77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये शेवटच्या दिवशी पुरस्कार सोहळ्यात भारतीय सिनेमाचा दबदबा पाहायला मिळाला. दिग्दर्शक पायल कपाडियाची फिचर फिल्म 'ऑल वी इमेजिन एज लाइट' ने ग्रांड प्रिक्स हा पुरस्कार जिंकला. ग्रांड प्रिक्स हा 'पाल्मे डी' नंतरचा या महोत्सवातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. पायल कपाडिया दिग्दर्शित या सिनेमात कनी कुश्रुति, दिव्या प्रभा, छाया कदम आणि हृदयु हारून हे मुख्य भूमिकेत आहेत. तर पाल्मे डी हा पुरस्कार 'अनोरा' यांना मिळाला आहे.
'ऑल वी इमेजिन एज लाइट' या सिनेमाचा प्रीमियर 2024 कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये 24 मे रोजी दाखवण्यात आला. 30 वर्षांत पहिल्यांदा भारतीय सिनेमा कान्समध्ये दाखवण्यात आला. या अगोदर 1994 साली शाजी एन करुण यांचा 'स्वाहम' हा सिनेमा दाखवण्यात आला.
पायल कपाडिया द्वारे लिखित 'ऑल वी इमेजिन एज लाइट' या सिनेमाची कथा केरळच्या दोन नर्सवर आधारीत आहे. या सिनेमात मुख्य पात्र नर्सचं असून ही भूमिका कनी कुसरुती सादर करत आहे. जेव्हा तिला तिच्या एक्स पतीकडून अनपेक्षित भेट मिळते आणि तिच्या भावना पुन्हा जागृत होतात. प्रभा तिच्या भूतकाळातील गुंतागुंतीशी झुंजत असताना, तिची रूममेट अनु प्रेमात पडते आणि तिचा तो प्रवास सुरु होतो. हा सिनेमा मुंबईच्या गोंधळलेल्या रस्त्यांच्या पार्श्वभूमीवर सुंदरपणे चित्रित केले आहे. प्रभाच्या आत्म-शोधाच्या प्रवासापासून ते अनुच्या उमलत्या प्रणयापर्यंत, 'ऑल वी इमॅजिन ऍज लाइट' प्रेम, तोटा आणि आनंदाच्या शोधाचा सखोल मानवी अन्वेषण करण्याचे वचन देते.
यंदाचा कान्स चित्रपट महोत्सव अनेक अर्थांनी भारतासाठी खास आहे. एकीकडे भारतीय कलाकार रेड कार्पेटवर चमकताना दिसत असताना, 30 वर्षांत प्रथमच, भारतीय चित्रपट 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' या फेस्टिव्हलमध्ये ग्रांड प्रिक्स अवॉर्ड पटकावला. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याला 8 मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळाले. अशा परिस्थितीत पायल कपाडियाने या चित्रपटाद्वारे इतिहास रचून देशाचा गौरव केला आहे. त्याचवेळी त्यातील स्टार्सनी डान्स करत रेड कार्पेटवर एवढी धमाकेदार एन्ट्री केली की, सर्वांचे लक्ष आपोआपच त्यांच्याकडे गेले.