अनन्या पांडेनं केली हिप सर्जरी? फोटोमुळे एकच चर्चा

Ananya Panday Hip Surgery : अनन्या पांडेनं शेअर केलेल्या फोटोमुळे सगळे तिला ट्रोल करु लागले आहेत.

दिक्षा पाटील | Updated: Aug 4, 2024, 04:29 PM IST
अनन्या पांडेनं केली हिप सर्जरी? फोटोमुळे एकच चर्चा title=
(Photo Credit : Social Media)

Ananya Panday Hip Surgery : बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची लेक अनन्या पांडेनं वयाच्या 18 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तरी देखील प्रेक्षकांच्या मनात जागा करण्यास ती अपयशी ठरली. नेटकऱ्यांमध्ये ती सतत चर्चेत राहिली असून ती अनेकदा ट्रोल झाली आहे. अनन्या गेल्या पाच वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तरी देखील ती तिच्या लूक्समुळे चर्चेत राहते. अनन्या तिच्या दिसण्यावरून आणि तिच्या शरीराला घेऊन किती असुरक्षित आहे हे तिनं स्वत: एकदा सांगितलं होतं. दरम्यान, नुकताच अनन्यानं एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. इतकंच नाही तर अनन्यानं सर्जरी केल्याची देखील चर्चा रंगू लागली. 

अनन्या पांडेनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. ज्यात तिनं हिपची सर्जरी केल्याचं म्हटलं जात आहे. खरंतर अनन्या पांडेनं एक मिरर सेल्फी शेअर केली होती. अनन्यानं नूडल पट्टिया असलेला ग्रे रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. तर यावेळी सटल मेकअप आणि बन हेअरस्टाइलनं तिच्या लूकला पूर्ण केलं. त्यासोबत अनन्यानं तिचं वॉडरोब देखील दाखवलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अनन्यानं हा फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी रेडिटवर शेअर केला आणि त्यासोबत त्यांनी सांगितलं की अनन्यानं हिप सर्जरी केली आहे. एका नेटकऱ्यानं सांगितलं की अनन्या नेहमीच तिच्या लूकला घेऊन असुरक्षित राहिली आहे आणि तिला असं दिसणं खरंच वाईट आहे. तर दुसरा नेटकरी म्हणाला, तिनं बट पॅड वापरला असेल. 

याआधी अनन्या पांडेनं सोशल मीडियावर तिच्या ट्रान्सफॉर्मेशनची एक झलक दाखवली होती. तर त्यानंतर देखील अनन्या ट्रोल झाली होती. त्यावेळी अनन्यानं लिप्सवर फिलर केल्याचे दिसले. अनन्यानं लिव्हिंग रूममध्ये सेल्फी क्लिक केला होता. त्यावेळी तिनं स्ट्रॅपी ड्रेस परिधान केला होता. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर तिला तिच्या लूक्सवरून ट्रोल करण्यात आले. 

हेही वाचा : सकाळी उठल्या उठल्या नीता अंबानी पितात 'हे' खास पाणी, वयाच्या 60 व्या वर्षीही दिसतात फिट आणि Maintained

दरम्यान, अनन्या लवकरच 'कॉल मी बे' या ओटीटी सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजची निर्मिती इशिता मोइत्रानं केली आहे आणि कॉलिन डी कुन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत वीर दास, गुरफतेही पीरजादा, विहान समत, वरुण सूद, मुस्कान जाफरी, लिसा मिश्रा, निहारिका लायरा दत्त आणि मिनी माथुर देखील दिसणार आहेत.