Great Khali Claim Viral Video: भारताचा डब्लूडब्लूई सुपरस्टार द ग्रेट खलीने डब्लूडब्लूई हे स्क्रीप्टेड असतं असं म्हटलं आहे. 'बिग बॉस' आणि अनंत अंबानींच्या लग्नाशी त्याने डब्लूडब्लूईची तुलना केली आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना खलीने हे विधान केलं. मुलाखतकाराने खलीला 'बिग बॉस' स्क्रीप्टेड असतं का असा प्रश्न विचारला होता. खलीने केवळ 'बिग बॉस' स्क्रीप्टेड असतं इतकाच खुलासा न करता इतर दोन गोष्टींचाही यात समावेश करत त्या सुद्धा स्क्रीप्टेड असतात असं म्हटलं आहे.
ग्रेट खलीने डब्लूडब्लूई स्क्रीप्टेड असल्याचा दुजोराही दिला. एवढ्यावरच न थांबता एक पाऊल पुढे जात अनंत अंबानींच्या लग्नाचा कार्यक्रमही स्क्रीप्टेड होता असा दावा केला आहे. सुरुवातीला प्रश्नाचं उत्तर देताना खलीने 'बिग बॉस' स्क्रीप्टेड असतं असं मान्य केलं. त्यावर मुलाखतकाराने डब्लूडब्लूई नक्कीच स्क्रीप्टेड नसेल असं म्हणत प्रश्न उपस्थित केला. त्यावर खलीने ही शंका दूर करताना डब्लूडब्लूई सुद्धा स्क्रीप्टेड असतं असं म्हटलं. डब्लूडब्लूई या कंपनीशी करार केल्यानंतर जे काही घडलं ते सारं स्क्रीप्टेड असतं. रिंगमध्ये लढणाऱ्यांना केवळं जे ठरवून दिलं आहे ते योग्यपद्धतीने लोकांसमोर सादर करायचं असतं, असं खली म्हणाला.
खलीने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. डब्लूडब्लूई हॉल ऑफ फेम राहिलेल्या खलीने इथे अनेक प्रसिद्ध लोकांची भेट घेतली. या ठिकाणी खलीने अंबानी कुटुंबाबरोबरच भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि इतर सेलिब्रिटींनाही भेटला. अनंत अंबानींच्या लग्नाला जॉन सीनाही उपस्थित होता. त्यामुळे या दोघांमध्ये फाईट होऊन जावी असंही अनेकांनी या लग्नातील फोटो पाहून मस्करीत म्हटलं होतं.
खलीने लग्न सुद्धा स्क्रीप्टेड असतात असं विधान केल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण देताना, 'लग्नामध्ये भटजीच लग्नाची सर्व विधी स्क्रीप्ट करुन देतात. भटजींची उपस्थिती, जोडप्याने घेतलेले सात फेरे, त्यांनी मोठ्यांचे आशिर्वाद घेणे हे सारं काही स्क्रीप्टेड असतं. खरं तर आपलं संपूर्ण आयुष्यच स्क्रीप्टेड असतं, असंही खली म्हणाला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
2021 मध्ये खलीला डब्लूडब्लूई हॉल ऑफ फेम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2017 मध्ये खली डब्लूडब्लूईचा शेवटचा सामना खेळला. अनेकांनी खलीला पुन्हा एकदा डब्लूडब्लूईच्या रिंगमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.