अनीता हसनंदानीने सांगितले ब्रेस्टफिडींगचे फायदे, शेअर केला मुलासोबतचा व्हिडिओ

अनीताने शेअर केली खास गोष्ट 

Updated: May 7, 2021, 01:26 PM IST
अनीता हसनंदानीने सांगितले ब्रेस्टफिडींगचे फायदे, शेअर केला मुलासोबतचा व्हिडिओ  title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'नागिन' मधील अभिनेत्री अनीता हसनंदानी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय चेहरा आहे. ती अनेकदा चाहत्यांसोबत आपल्या मुलाचा आरवचा फोटो शेअर करत असते. तसेच खासगी आयुष्याचे अपडेट देत असते. अनीता सोशल मीडियार ऍक्टिव आहे. हल्लीच तिने आकवचा ब्रेस्टफिडींग करण्यावरूनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये आपल्या बाळाला ब्रेस्टफिडिंग करणं किती महत्वाचं आहे ते सांगितलं आहे 

अनीत हसनंदानीने फेब्रुवारी महिन्यात मुलगा आरवला जन्म दिला. आपल्या प्रेग्नेसी दरम्यान तिने नवरा रोहित रेड्डीसोबत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. ऑपरेशन थिएटरमध्ये रोहित, अनीतासोबत होता. याची माहिती त्याने सोश मीडियावर पोस्ट केली होती.  

या व्हिडिओत ती आरवला किती वर्षापर्यंत ब्रेस्ट फिडिंग करणार याबाबत बोलत आहे. अनीता यामध्ये सांगतेय की,'एक आई असल्यामुळे मला माझ्या बाळासाठी सगळं काही करायचं आहे. जेव्हा आरवने जन्म घेतला तेव्हा डॉक्टरांनी मला एक सल्ला दिली. बाळ आणि आईच्या तब्बेतीकरता बाळाला न्यूट्रीशनची गरज असते. ते म्हणजे ब्रेस्ट मिल्क.' 'ब्रेस्ट मिल्कमध्ये एँटीबॉडीज असतात. ज्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती चांगली होती. हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे असते. त्यामुळे त्याचवेळी निर्णय घेतला की, आरवला ब्रेस्ट फीड करेन.'