Ankita Lokhande Good News: लग्नाच्या सहा महिन्यांनंतर विकी-अंकिताने दिली गुडन्यूज

अभिनेत्री अंकिता लोखंडे लग्नानंतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Updated: Jun 11, 2022, 08:40 AM IST
Ankita Lokhande Good News: लग्नाच्या सहा महिन्यांनंतर विकी-अंकिताने दिली गुडन्यूज title=

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे लग्नानंतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अलीकडेच अंकिता आणि विकीने 'स्मार्ट जोडी'चा किताब पटकावला आहे. यानंतर आता या स्टार कपलने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. वास्तविक, विकी जैन आणि अंकिता लोखंडे त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत आणि या कपलने अतिशय नेत्रदीपक शैलीत त्यांच्या नवीन घरात प्रवेश केला आहे.

लग्नानंतर सहा महिन्यांनी दिली आनंदाची बातमी
विकी अंकिताने त्यांच्या नवीन घरात गृहप्रवेशची पूजा केली. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. लग्नाच्या 6 महिन्यांनंतर अखेर ते त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. अंकिताने 10 जून 2022 रोजी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिचा पती विकी जैनसोबत रोमँटिक पोज देताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत अंकिता लोखंडेने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "नवीन सुरुवातीच्या शूभेच्छा बेबी #newhome"

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हे घर अतिशय आलिशान आहे
या फोटोच्या पार्श्वभूमीवर विकी अंकिताच्या घराचं रॉयल इंटीरियरही पाहायला मिळत आहे. हे फोटो पाहिल्यानंतर हे स्पष्ट होतं की, विकी अंकिताने हे स्वप्नातील घर मोठ्या प्रेमाने एका खास पद्धतीने डिझाइन केलं आहे. अंकिताच्या या पोस्टवर चाहते तसंच सेलिब्रिटीही तिचं अभिनंदन करत आहेत. नवीन घरासाठी सर्वजण त्यांचं अभिनंदन करत आहेत.