'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडेची आता बॉलिवूडमध्ये एंट्री

झी टीव्हीवरील गाजलेल्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेता संजय दत्तसोबत अंकिता बॉलिवूड डेब्यू करणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 1, 2017, 08:19 PM IST
'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडेची आता बॉलिवूडमध्ये एंट्री title=

मुंबई : झी टीव्हीवरील गाजलेल्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेता संजय दत्तसोबत अंकिता बॉलिवूड डेब्यू करणार आहे.

अंकिता लोखंडे या ब्युटिफुल गर्लने आपला पहिला बॉलिवूड चित्रपट साईन केल्याची जोरदार चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, संजय दत्तचा आगामी चित्रपट अंकिताने साईन केलाय. संजय दत्त लवकरच 'मलंग' असे नाव असलेल्या सिनेमात दिसणार आहे. 

दरम्यान, या सिनेमाबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. अनेक महिने प्रतीक्षा केल्यानंतर अखेर अंकिताचे भाग्य उजाळलेय. गेल्या अनेक वर्षांपासून अंकिता अशाच एका ब्रेकच्या प्रतीक्षेत होती. सर्वप्रथम अंकिता शाहरूख खानसोबत 'हॅपी न्यू ईयर'मधून बॉलिवूड डेब्यू करणार, अशी खबर होती. पण ही खबर पुर्णत: खोटी ठरली. या चित्रपटात अंकिता नाही तर दीपिका पादुकोणची वर्णी लागली. यापश्चात संजय लीला भन्साळी यांच्या ;पद्मावती;त अंकिता झळकणार, अशीही चर्चाही रंगली. पण ही चर्चाही केवळ पोकळ ठरली.