Ankita Lokhande च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, लग्नाआधीच तुटलं बॉयफ्रेंडसोबतचं नातं?

अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Updated: Oct 11, 2021, 09:42 PM IST
Ankita Lokhande च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, लग्नाआधीच तुटलं बॉयफ्रेंडसोबतचं नातं?  title=

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज अभिनेत्री तिचे फोटो शेअर करत असते. पण अलीकडेच तिने तिचा असा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर एक्टिव अंकिता
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. तिने आपल्या जबरदस्त अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याच बरोबर, लोकं रिल्ससाठी वेडे आहेत. अंकिता लोखंडे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून चाहत्यांना तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याची ओळख करून देत राहते. अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहते हतबल आहेत.

अंकिताने शेअर केला व्हिडिओ 
अंकिता तिच्या कामापेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत असते. ती बऱ्याच काळापासून बिझनेसमन विक्की जैनला डेट करत आहे. आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर चाहत्यांसोबत तिचा बॉयफ्रेंड विकीचा ताण वाढवत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गाण्यावर केलं लिपसिंक 
अलीकडेच अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात ती विचित्र डान्स करताना दिसत आहे. या रीलमध्ये, अंकिता धनुष आणि काजल अग्रवाल यांच्या 'मेरी' चित्रपटातील 'भाड मे गया प्यार व्यार,  या हिंदी गाण्यावर लिपसिंक करत आहे. या गाण्यानंतर अभिनेत्री 'ब्राऊन मुंडे' या पंजाबी गाण्यावर नाचू लागते.