मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार श्रीदेवीच्या जाण्याने कपूर कुटुंबियावर मोठं संकट कोसळलं.
श्रीदेवीच्या मागे पती बोनी कपूर आणि दोन्ही मुली एकट्या पडल्या आहेत. त्यातच श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर आज 7 मार्च रोजी आपला 21 वा वाढदिवस साजरा करत आहे. आईशिवाय आपला वाढदिवस ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती. पण तिच्या कुटुंबियांनी दिला या दिवशी अनोखं सरप्राईज गिफ्ट दिलं आहे.
अशातच जान्हवीची सावत्र बहिण अंशुला कपूरने दिला अनोख गिफ्ट दिलं आहे. आपल्याला माहितच आहे की, बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी लग्न केल्यावर अर्जून कपूर आणि अंशुला कपूर आपल्या आईसोबत राहत होते. ही दोन्ही कुटुंब वेगळी झाली होती. मात्र श्रीदेवीच्या निधनानंतर हे दोघेही एकत्र आले आहेत.
जान्हवीला गिफ्ट काय दिलं हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. अशातच अंशुलाने जान्हवीला इंस्टाग्राम वर फॉलो करून खास गिफ्ट दिलं आहे. तसेच तीच हे गिफ्ट स्विकारत जान्हवी आणि खुशी कपूरने तिला रिटर्न फॉलो केलं आहे.