#Ishaambaniwedding : अँटीलियाही म्हणतंय, 'नववधू प्रिया मी...'

ईशा अंबानीच्या लग्नासाठी अँटीलियाचा नववधु साज 

 #Ishaambaniwedding :  अँटीलियाही म्हणतंय, 'नववधू प्रिया मी...' title=

मुंबई : राजस्थानच्या उदयपुरमध्ये प्री वेडिंग सोहळा पार पडल्यानंतर आज ईशा अंबानी आणि आनंद पिरामल बुधवारी अँटीलियामध्ये सात फेरे घेणार आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या लग्नाला एक करोड डॉलरहून अधिक खर्च झाला आहे. 

मिडीयाला मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण लग्नाला 10 करोड डॉलर खर्च होण्याची शक्यता आहे. उदयपुरच्या कार्यक्रमात अमेरिकेच्या माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलेरी क्लिंटन, वैश्विक बँकरो आणि बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Here’s another glimpse of the grand decor for #IshaAmbani and #AnandPiramal’s wedding ceremony on Wednesday.

A post shared by Filmfare (@filmfare) on

साऊथ मुंबई स्थित असलेल्या मुकेश अंबानी यांचा आलिशान विला अँटीलिया एका नववधुप्रमाणे सजला आहे. अँटीलियाच्या गेटला सुंदर लाल फूलांनी सजवलं असून त्यावर गोल्डन रंगाचे रॅपिंग दिले आहेत. तर घराच्या दरवाज्याला सफेद रंगाच्या सुंदर फुलांनी झालर केली आहे.

जणू एखादी नवरी घुंघटमध्ये सजली आहे. घराच्या मुख्य दरवाजावर मंडप उभारण्यात आला आहे. एंटीलिया ही जवळपास 27 मजले इमारत आहे. ही बनवण्यासाठी 10,500 करोड रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे या घराला आता देखील तसंच अगदी ऐश्वर्यात सजवलं आहे.

फोर्ब्स द्वारे जगभरातील अरबपतींच्या घराची लिस्ट जाहिर केली होती. या यादीत अँटीलिया पहिल्या क्रमांकावर आहे. रिपोर्टनुसार 27 मजल्याच्या या इमारतीत फक्त सहा माळे हे पार्किंग आणि गॅरेजकरता आहे. यामध्ये जवळपास 160 गाड्यांच्या पार्किंगची सोय आहे. 

अँटीलियाचा संपूर्ण एरिया हा जवळपास 4 लाख वर्ग फूट असून एंटीलियात 3 हेलीपॅड, 50 सीटर थिएटर, 9 मोठ्या लिफ्ट, जिम आहे. एंटीलियाच्या एका रूमचं छत हे पूर्णपणे क्रिस्टलने तयार केलेली आहे.