हिराला स्वीकारणार का? या प्रश्नावर अनुपम खेर यांची कोपरखळी

सोनी मॅक्स वाहिनीचा सूर्यवंशम सिनेमासोबत करार

Updated: Mar 2, 2021, 03:30 PM IST
हिराला स्वीकारणार का? या प्रश्नावर अनुपम खेर यांची कोपरखळी

मुंबई : बॉलिवूडमधील काही निवडक चित्रपट आहेत जे टीव्ही चॅनेल्सवर बर्‍याच वेळा दाखवले जातात. अनेकदा पाहूनही ही सिनेमे प्रेक्षकांना आपल्याशी जोडून ठेवतात. अमिताभ बच्चन यांचा 'सूर्यवंशम' हा डबल रोल सिनेमा आहे. या चित्रपटाच्या प्रसारणाच्या संदर्भात अनेक मीम्स ट्विटरवरही बर्‍याच वेळा पाहिले जातात. एवढंच नव्हे तर या सिनेमाचे डायलॉग प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. पुन्हा एकदा चॅनेल सोनी मॅक्सने या चित्रपटाच्या टेलीकास्टचा प्रचार करणारे एक ट्विट केले. या चित्रपटाचे अभिनेते  अनुपम खेर यांनी ट्विटवर खूप मजेदार प्रतिक्रिया दिली आहे.

चॅनेलने केला प्रक्षेकांना हा प्रश्र

'सूर्यवंशम' हा चित्रपट पुन्हा एकदा टीव्हीवर दाखविला जाणार आहे. चॅनलने आपल्या प्रसारित वेळेविषयी ट्विट केले. ज्यात त्याने एक प्रश्न प्रेक्षकांसमोरही ठेवला. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना चॅनलने येथे लिहिले आहे, 'भानु प्रताप सिंह ठाकूर यांचे मन हीरा जिंकेल का?'

अनुपम खेर यांनी दिले मजेशीर उत्तर 

जेव्हा चॅनेलने हा प्रश्न विचारला तेव्हा लोकांकडून या प्रश्नाला एक मजेदार प्रतिसाद मिळू लागला. महत्वाच बाब म्हणजे हे ट्विट पाहून या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारे अभिनेता अनुपम खेरही आपले हास्य रोखू शकले नाही आणि त्यांनी एक विचित्र प्रतिक्रिया दिली. यावर पुन्हा ट्विट करत अनुपमने लिहिले, 'माझ्या प्रिय सोनीमॅक्स मुव्ही चॅनलवाल्यानो' तुमचा हा प्रश्न पाहून मला हसू आवरता आले नाही. हा चित्रपट बर्‍याच वेळा दाखवण्यात आला आहे.  आता चंद्रावर राहणारे लोक देखील या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात. जय हो'. यासह त्याने अनेक मजेदार इमोटिकॉनही शेअर केले आहेत.

अनुपम खेर यांचे ट्विटर वायरल

आता प्रेक्षकांनाही अनुपम यांची ही मजेदार शैली पसंत पडली आहे. त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर वायरल झाले आहे. अनुपम यांच्या ट्विटवर अनेकजण आता चॅनलचा आनंद घेत आहेत. या चित्रपटासंदर्भातील सस्पेन्स प्रश्नावर प्रत्येकजण हसत आहे. कारण हा चित्रपट शेकडो वेळा प्रसारित झाला आहे, त्यामध्ये सस्पेन्स असे काही नाही.