अभिनेत्रीच्या आईने 65व्या वर्षी दिलं डान्स ऑडिशन, Video व्हायरल

सध्या प्रेक्षकांना टीव्ही सिरियल 'अनुपमा' खूप आवडते. 

Updated: Aug 29, 2021, 02:55 PM IST
अभिनेत्रीच्या आईने 65व्या वर्षी दिलं डान्स ऑडिशन, Video व्हायरल title=

मुंबई : सध्या प्रेक्षकांना टीव्ही सिरियल 'अनुपमा' खूप आवडते. शोच्या प्रत्येक पात्रासह, प्रत्येक चढ -उतारांसह, शोचे चाहते स्वतःला जोडलेले वाटतात. 'अनुपमा'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या रुपाली गांगुलीनेही फार कमी वेळात लोकांच्या हृदयात आपली छाप सोडली आहे.

पण टीव्हीच्या जगात नाव कमावण्याआधी रूपाली चित्रपटांमध्ये काम करायची. एवढेच नाही तर तिने मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत रोमान्सही केला आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एकदा रुपालीच्या आईने मिथुन यांच्यासमोर डान्स इंडिया डान्सच्या स्टेजवर परफॉर्म केले, जे पाहून मिथुन थक्क झाला.

रूपालीच्या आईने दिली ऑडिशन 

छोट्या पडद्यावरील नंबर एक शो 'अनुपमा' ने लॉन्च झाल्यापासून टीआरपीमध्ये झेंडे उभारले आहेत. राजन शाहीच्या 'अनुपमा' या मालिकेची कथा आणि तिचे ट्विस्ट प्रेक्षकांना खूप आवडले आहेत.
आजकाल रूपाली गांगुलीचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये रुपाली तिच्या खऱ्या आयुष्यातील आईसोबत दिसत आहे. जी एका टीव्ही शोमध्ये ऑडिशनला आली होती आणि मिथुन चक्रवर्ती शोला जज करत होते.

मिथुनच्या गाण्यावर परफॉर्मन्स

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ सुमारे 8 वर्ष जुना आहे. यामध्ये 'अनुपमा' फेम अभिनेत्री रूपाली गांगुली तिची आई रजनी गांगुलीसह टीव्ही रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्समध्ये पोहोचली. येथे रजनी गांगुलीने मिथुन चक्रवर्तीसमोर त्याच्या डिस्को डान्सर गाण्यावर डान्स ऑडिशन दिली होती.