सासऱ्यासोबत सूनेचा रोमॅन्टिक डान्स, चर्चा तर होणारच ना !

प्रसिद्ध छोट्या पडद्यावरील टीव्ही शो 'अनुपमा' दर आठवड्याला टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असतो. 

Updated: Sep 23, 2021, 11:30 AM IST
सासऱ्यासोबत सूनेचा रोमॅन्टिक डान्स, चर्चा तर होणारच ना ! title=

मुंबई : प्रसिद्ध छोट्या पडद्यावरील टीव्ही शो 'अनुपमा' दर आठवड्याला टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असतो. हा शो प्रेक्षकांना त्यातील पात्रांइतकाच आवडतो. याच कारणामुळे शोसोबत संबंधित कलाकारांची फॅन फॉलोविंग वाढत आहे. त्याचबरोबर, अलीकडेच 'अनुपमा' शोमध्ये 'किंजल'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निधी शाहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती तिच्या ऑनस्क्रीन सासरे वनराज यांच्यासोबत रोमँटिक अंदाजात नाचताना दिसत आहे.

निधी शाहने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती शोमध्ये 'सासूर जी' ची भूमिका साकारणारा अभिनेता सुधांशु पांडा सोबत डान्स करताना दिसत आहे. ती दक्षिण सिनेमाच्या 'राऊडी बेबी' या प्रसिद्ध गाण्यावर रोमॅन्टिक अंदाजात नाचत आहे. त्याचबरोबर सुधांशूची शैलीही पाहण्यासारखी आहे. दोघांच्या या व्हिडिओचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

हा व्हिडिओ शेअर करताना निधीने एक कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिलं आहे की, 'कधीकधी केवळ प्रेक्षक आणि प्रेक्षकच नाही तर कलाकारांनाही त्यांचे पात्र विसरण्याची इच्छा असते की त्यांनी साकारलेले पात्र केवळ पडद्यासाठी असते आणि स्वतःला रीलमधून बाहेर काढणे आणि वास्तवाशी जोडणे आणि मजा करणे देखील आवश्यक असते. 'आहे'.