मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपला वर्सोवा पोलिसांकडून समन्स पाठवण्यात आलं आहे. अभिनेत्री पायल घोषने लैंगिक अत्याचाराचे आरोप लावत त्याचाविरोधात 1 ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याला चौकशीसाठी उद्या वर्सोवा पोलीस स्थानकात बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आता अनुरागतच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पायलने याप्रकरणी राज्यपालांची देखील भेट घेतली होती. तेव्हा राज्यपालांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तिला दिले होते.
बलात्कार, गैरवर्तन आणि अशोभनिय कृत्य केल्याप्रकरणी कलम 376, 354, 341, 342 अन्वये लेखी तक्रार दाखल केल्याचं वक्तव्य पायलचे वकील नितिन सातपुते यांनी केलं. तर यावेळी पायल घोषने अटकेची मागणीही केली
Mumbai Police summons film director Anurag Kashyap (in file photo) asking him to appear at Versova Police station tomorrow at 11 am, in connection with the alleged sexual assault against actor Payal Ghosh. pic.twitter.com/JLnlgO6Pzb
— ANI (@ANI) September 30, 2020
अनुराग कश्यपने माझ्यासोबत जबरदस्ती केली असल्याचं सांगत पायल घोषने व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची विनंती केली आहे. याबाबतचं सांगणं माझ्यासाठी नुकसानकारक असून माझी सुरक्षाही धोक्यात असल्याचं सांगत, तिने ट्विटरवर पोस्टवरुन मदतीची विनंतीही केली.
याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनीही पालयला पाठिंबा दिला असून पायलकडे याबाबत संपूर्ण माहिती मागितली आहे. मात्र पायलने केलेले सर्व आरोप अनुरागने फेटाळले आहेत.