Anurag Kashyap On The Kerala Story: सध्या देशभर चर्चेच्या कट्यावर रंगतोय तो 'द केरला स्टोरी' हा सिनेमा. कथेमुळे आणि दाव्यांमुळे हा चित्रपट (The Kerala Story) चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच केरला स्टोरी चित्रपट 9 मे रोजी यूपीमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात देखील वाद शिगेला पोहोचलाय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Bannerjee) यांच्या निर्णयानंतर ‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय. अशातच आता सेन्सरबोर्डविरुद्ध आवाज उठवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी या प्रकरणावर रोखठोक मत व्यक्त केलंय.
तुम्ही चित्रपटाशी सहमत असाल किंवा नसो, तो प्रपोगेंडा असो वा काउंटर प्रोपेगेंडा असो, आक्षेपार्ह असो वा नसो, त्यावर बंदी घालणं चुकीचं आहे, असं स्पष्ट मत अनुराग कश्यप (Anurag Kashyap On The Kerala Story) यांनी व्यक्त केलं आहे. ट्विट करत त्यांनी प्रपोगेंडाविरोधात लढण्याचा खरा अर्थ काय आहे, यावर देखील भाष्य केलंय.
तुम्हाला प्रपोगेंडाचा मुकाबला करायचा असेल तर मग मोठ्या संख्येने सिनेमा पाहण्यासाठी जा. सोशल मीडियाच्या गैरवापराच्या विरोधात आणि द्वेष आणि अशांतता निर्माण करण्यासाठी जन्मजात पूर्वग्रह कसे शस्त्र बनवलं जातं, यावर भाष्य करणारा चित्रपट पाहा. हा सिनेमागृहांमध्ये चालू आहे आणि त्याला 'अफवाह' म्हणतात. सिनेमा पाहण्यासाठी जा आणि तुमचा आवाज मजबूत करा. लढण्याचा हाच योग्य मार्ग आहे, असं म्हणत अनुराग कश्यप यांनी (Anurag Kashyap tweets) अनेकांना सल्ला दिला आहे. अनुराग कश्यप यांनी अनेकदा उजव्या विचारधारेविरुद्ध दंड थोपटलेत. मात्र, यंदा त्यांनी केरला स्टोरीच्या बाजूने आवाज उठवल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
You want to fight propaganda. Then go in numbers and see the film that talks against misuse of social media and how inherent prejudice is weaponised to create hatred and unrest. It’s running in cinemas and is called “Afwaah”. Go make your voice stronger. Go make a point. That’s…
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) May 9, 2023
दरम्यान, 'द केरला स्टोरी' या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 8.03 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह (The Kerala Story box office Collection) जबरदस्त ओपनिंग केली होती. त्यानंतर आता या चित्रपटाची एकूण कमाई 50 कोटींच्या पुढे गेल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी आणि रविवारी या सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. या दोन्ही दिवशी अनुक्रमे 11.22 कोटी रुपये आणि 16.40 कोटी रुपयांचा गल्ला चित्रपटाने कमावला आहे.