ज्याची सगळ्यांना भीती होती ते घडलंच... आई झाल्यानंतर अनुष्काचा मोठा निर्णय

त्यामुळे ती अभिनयाची निवड करत आहे. 

Updated: Mar 19, 2022, 05:50 PM IST
  ज्याची सगळ्यांना भीती होती ते घडलंच... आई झाल्यानंतर अनुष्काचा मोठा निर्णय title=

मुंबई : अनुष्का शर्मा बर्‍याच काळापासून अभिनय जगतापासून दूर आहे, आता अभिनेत्रीने तिच्या व्यावसायिक आयुष्याशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे.

अनुष्का आई झाल्यानंतर अभिनय क्षेत्रापासून काहीशी दूर होती. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला होता की आता अनुष्का सिने क्षेत्रात कमबॅक कधी करणार? पण आता एक मोठी बातमी समोर आली आहे. अनुष्काच्या चाहत्यांमध्ये याबाबत जोरदार चर्चा होत आहे

अनुष्काने काही काळापूर्वी अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं होतं, मात्र अनुष्काने तिचे प्रॉडक्शन हाऊस आता सोडले आहे.

अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ती प्रोडक्शन हाऊसमधून बाहेर पडत आहे. अभिनेत्रीने पोस्टद्वारे तिचे प्रोडक्शन हाउस 'क्लीन स्लेट फिल्म्स' सोडण्याची घोषणा केली आहे.

अनुष्का गेल्यानंतर कंपनी बंद होणार नसली तरी आता फक्त तिचा भाऊ हे काम सांभाळणार आहे.

तिच्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, तिने आतापर्यंत जे काही काम केले आहे त्याचा तिला अभिमान आहे. पण आई झाल्यानंतर तिला अनेक गोष्टींचा समतोल साधावा लागत आहे. त्यामुळे ती अभिनयाची निवड करत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनुष्का आता फक्त अभिनयावर लक्ष केंद्रित करणार असून तिच्या भावाने सुरू केलेले प्रॉडक्शन हाऊस 'क्लीन स्लेट फिल्म्स' आता फक्त तोच सांभाळणार आहे.

पोस्टमध्ये अभिनेत्रीने असेही लिहिले आहे की, यामध्ये ती तिच्या भावाला नेहमीच प्रोत्साहन देईल. यासाठी अनुष्काने कर्णेशला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.