नवी दिल्ली : लग्नानंतर आपआपल्या कामावर परतलेले विराट आणि अनुष्का आपली वर्क कमिटमेंट पूर्ण करण्यात व्यस्त आहेत.
येणाऱ्या वॅलेंटाईनला विराट-अनुष्काचा काय प्लान असणार याबद्दल त्यांच्या फॅन्समध्ये उत्सुकता आहे.
पण त्यांच्यासाठी एक दु:खद बातमी आहे. कारण लग्नानंतरच्या पहिल्याच वॅलेंटाईनला अनुष्का विराट सोबत नसणार आहे.
अनुष्का शर्मा तिचा आगामी सिनेमा 'परी' च्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे.
तसेच तिचा येणारा सिनेमा 'सुई धागा' ची तयारीही जोरदार सुरू आहे.
मीडिया रिपोर्टनुसार अनुष्का फेब्रुवारी १४ ला वरूण धवनसोबत आपला आगामी सिनेमा 'सुई धागा' ची शुटींग करणार आहे.
यामूळे या वॅलेंटाईनला विराटला वेळ देऊ शकत नाही.
तिला हा दिवस वरूण धवनसोबत सेलिब्रेट करावा लागणार आहे. लग्नानंतरचा पहिलाच वॅलेंटाईनला अनुष्का विराटसोबत नसल्याने त्यांच्या फॅन्समध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.