इतकी वर्षे चित्रपटांपासून दूर असूनही 1200+ कोटींची संपत्ती, अनुष्का शर्मा नेमकं करते तरी काय?

Anushka Sharma Net Worth : दुसऱ्यांदा आई झालेली अभिनेत्री अनुष्का शर्मा कोटी रुपयांची मालकीण आहे. अनुष्काने 2022 मध्ये Qala सिनेमात भूमिका साकारली होती. त्यानंतर तिचा कोणताच सिनेमा आलेला नाही. मग अनुष्काकडे एवढी संपत्ती कशी? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 1, 2024, 03:46 PM IST
इतकी वर्षे चित्रपटांपासून दूर असूनही 1200+ कोटींची संपत्ती, अनुष्का शर्मा नेमकं करते तरी काय? title=

अभिनेत्री अनुष्का शर्मा 1 मे रोजी 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून अनुष्का शर्मा मोठ्या पडद्यापासून गायब आहे. पण तिच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनुष्का शर्मा फक्त सिनेमांमध्येच काम करते असे नाही तर अनुष्काची सर्वाधिक मिळकत ही इतर कामांमधून आहे. या दोन्ही करिअरमधून अनुष्का फॅन फॉलोइंग आणि संपत्ती कमवत आहे. तसेच अनेक ब्रँड्सचा चेहरा होताना अनुष्का दिसत आहे. तसेच अनुष्का शर्माची ओळख ही हायपेड अभिनेत्रींमध्ये केली जाते. 

अनुष्काची संपत्ती 

अनुष्का शर्मा तिच्या अभिनय आणि यशस्वी करिअरमुळे आरामदायी जीवन जगत आहे. ही अभिनेत्री जवळपास 350 कोटींची मालकीण आहे. वार्षिक कमाईबद्दल बोलायचे झाले तर, अनुष्का दरवर्षी 45 कोटींहून अधिक कमावते. त्यांचा पती क्रिकेटर विराट कोहलीच्या मालमत्तेसह पती-पत्नी दोघांच्या मिळून एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर दोघांची एकूण संपत्ती 1200 कोटी रुपये आहे. लग्नानंतर अनुष्का आणि विराटने मुंबईत 34 कोटी रुपयांची अपार्टमेंट खरेदी केलं होतं. याशिवाय त्यांच्याकडे गुरुग्राममध्ये 80 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

फोर्ब्स इंडिया 2019 कॅलेंडर यादीनुसार, हे जोडपे भारतातील सर्वात श्रीमंत जोडप्यांपैकी एक होते. याशिवाय विराट कोहलीचे दिल्लीत एक आलिशान घर आहे. तसेच विराट आणि अनुष्काकडेही अनेक आलिशान कार आहेत. त्याचबरोबर अनुष्का शर्माने केवळ चित्रपट आणि जाहिरातींच्या माध्यमातून खूप कमाई केली आहे.

लक्झरी कार्सचं कलेक्शन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शर्मा एका सिनेमासाठी 10-12 कोटी रुपये फी घेते. जाहिरातींसाठी 4 ते 5 कोटी रुपयांची फी आकारते. चित्रपटांव्यतिरिक्त, ती ब्रँड एंडोर्समेंट्स, जाहिराती, वैयक्तिक गुंतवणूक आणि स्वतःच्या व्यवसायातून देखील चांगली कमाई करते. याशिवाय ती इन्स्टाग्राम पोस्टमधूनही कमाई करते. त्याचे 1 किंवा 2 नव्हे तर 17 कंपन्यांशी ब्रँड एंडोर्समेंट करार आहेत. यामध्ये रजनीगंधा पर्ल्स, फॅशन ब्रँड लावी, रुपा अँड कंपनी, केरोविट, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, प्युअर डर्म, एल १८, सेंट्रम इंडिया, गीतांजली, प्रेगा न्यूज, गोदरेज एक्सपर्ट, पॅन्टीन, ब्रू कॉफी, लिप्टन आणि पेप्सी यांच्याकडून मोठी कमाई करते.