मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे बॉलिवूडमधील लाडकं कपल आहे. 2021 च्या सुरुवातीलाच अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला. विरुष्काने त्यांच्या लेकिचं नाव 'वामिका' असं ठेवलयं. विरुष्काच्या बरेच वर्ष प्रेमकथेची चर्चा होती. ११डिसेंबर २०१७ला हे कपल लग्नबंधनात अडकलं. यानंतर देखील हे कपल सातत्यानं कोणत्यानं कोणत्या कारणानं सोशल मीडिवर चर्चेत असतं. आता एका वेगळ्या गोष्टीची चर्चा आहे. एका मुलाखती अनुष्काने म्हटलंय की, ती चक्क विराटचे कपडे उधारीवर घेते. या गंमतीशीर वक्तव्याला सोशल मीडियावर उधाण आलं आहे.
या मुलाखतीत अनुष्काला तिच्या आणि विराटच्या स्टाईलबद्दल प्रश्न विचारला गेले होता. खरं तर हे कपल ट्रेंडिंग ड्रेसमध्ये बर्याचदा पाहायला मिळतं, विराटच्या कपड्यात अनुष्का बऱ्याचदा स्पॉट होते. म्हणून विराट कोहलीचे कपडे कधी घातलेले आहेस का? अशी विचारणा करण्यात आली होती.
अनुष्का शर्मा म्हणाली होती, 'मी नेहमी विराटच्या वॉर्डरोबमधून कपडे घेते, बहुतेकदा टी-शर्ट आणि अॅक्सेसरीज घेते. कधीकधी त्याच्या जॅकेटमध्ये मला खूप कर्म्फटेबल वाटतं, तर कधीकधी मला त्याचे कपडे घालायला देखील फार आवडतं.
यापूर्वी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या घरात एकही नोकर नसल्याचे भारतीय क्रिकेटपटू एका मुलाखतीत सांगितले होते. त्याने सांगितले, आमच्या घरी कोणतेही नोकर नाहीत. जेव्हा जेव्हा कोणी आमच्या घरी कोणी भेट देतो, तेव्हा ते दोघेही स्वतःच्या हाताने जेवण देतात.