'या' हटके अंदाजात अनुष्का शर्माचा पुतळा 'मादाम तुसाँ'मध्ये उभारणार

अभिनेत्री अनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा आता सिंगापूरच्या 'मादाम तुसाँ' म्युझियममध्ये दाखल होणार आहे. 

Updated: Jul 12, 2018, 08:44 AM IST
'या' हटके अंदाजात अनुष्का शर्माचा पुतळा 'मादाम तुसाँ'मध्ये उभारणार

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा आता सिंगापूरच्या 'मादाम तुसाँ' म्युझियममध्ये दाखल होणार आहे. ऑप्रा विन्फ्रे,  क्रिस्टिआनो रोनाल्‍डो, लुइस हैमिल्‍टन अशा इंटरनॅशनल सेलिब्रिटींसोबत अनुष्काचा पुतळा उभा राहणार आहे.  

अनुष्काच्या पुतळ्याचं खास वैशिष्ट्य 

अनुष्का शर्माचा सिंगापूरच्या 'मादाम तुसाँ' म्युझियममध्ये लागणारा पुतळा खास आहे. हा पुतळाअ इतर भारतीय सेलिब्रिटींच्या तुलनेत थोडा हटके आहे. कारण हा पुतळा हालचाल करणार आहे. बोलणार्‍या अनुष्काच्या स्वरूपात हा पुतळा साकारला जाणार आहे. अनुष्काच्या हातामध्ये फोन असेल तर हा पुतळा येणार्‍या लोकांना अभिवादनही करणार आहे. अशा प्रकारचा पुतळा असलेला अनुष्का ही पहिली भारतीय सेलिब्रिटी आहे. 

अनुष्का शर्माची जगभरात असलेली तिचा फॅन फॉलोविंग पाहता सिंगापूरच्या 'मादाम तुसाँ' म्युझियममध्ये अनुष्काचा पुतळा हटके अंदाजात साकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

लवकरच अनुष्का शर्मा वरूण धवनसोबत 'सुई धागा' या सिनेमात झळकणार आहे. सोबतच आनंद एल राय यांच्या 'झिरो' सिनेमात शाहरूख आणि कॅटरिना कैफ सोबत अनुष्का झळकणार आहे.