ए.आर.रेहमान यांच्या मुलीचा 'निकाह'...जावई करतो 'हे' काम

संगीतकार ए.आर.रेहमानने फॅमिली फोटो शेअर करून मुलीच्या लग्नाची बातमी दिली आहे. चाहत्यांकडून जोडप्याला भरभरून शुभेच्छा.

Updated: May 6, 2022, 10:36 AM IST
ए.आर.रेहमान यांच्या मुलीचा 'निकाह'...जावई करतो 'हे' काम title=

मुंबईः संगीताचा बाहशाह ए.आर.रेहमान यांनी नुकतीच एक चांगली बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.रेहमानने फॅमिली फोटो शेअर करून मुलीच्या लग्नाची बातमी दिली आहे. फोटोमध्ये, नवविवाहित जोडपे खतिजा आणि रियासदीन सोफ्यावर बसले आहेत तर वडील एआर रहमान आई सायरा बानो, भाऊ अमीन आणि बहीण रहिमा हे मागे उभे आहेत. चाहते या नव्या जोडप्याला भरभरून शुभेच्छा देत आहेत.

लग्नाबद्दल मुलीचे अभिनंदन आणि आशीर्वाद देताना एआर रहमानने लिहिले, 'देव या जोडप्याला आशीर्वाद देवो. तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणि प्रेमाबद्दल धन्यवाद'

खतिजा आणि रियासदीन यांची डिसेंबर 2021 मध्ये एंगेजमेंट झाली होती. खुद्द खतिजाने इन्स्टाग्रामवर ही बातमी दिली होती. रेहमान यांची मुलगी खतिजा ही सुद्धा एक गायिका आहे. तामिळ सिनेमातील अनेक सिनेमांमध्ये तिनं गाणी गायली आहेत. तर रियासदीन हा साऊंड इंजिनियर असून गेली अनेक वर्ष तोरेहमान यांच्यासोबतच काम करत आहे.

काही तासापूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून रेहमान ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर जवळजवळ काही लाखांपर्यंत लाईक्स मिळाले आहेत. या जोडप्याचे जवळचे नातेवाईक आणि चाहते कमेंट करून त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करत आहेत.

ए आर रहमान  आपल्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांना आपल्या खासगी आयुष्याबाबत सर्वांसमोर फारसं बोलायला आवडत नाही. त्यामुळे ते फारच कमी प्रसंगी आपल्या खाजगी आयुष्याबाबत पोस्ट शेअर करत असतात. आज ते मुलीच्या लग्नाच्या पोस्टमुळे चर्चेत आले आहेत.

खतिजा रहमानने 29 डिसेंबरला रियासदीन शेख मोहम्मदसोबत साखरपुडा केला होता. त्या दिवशी तिचा वाढदिवसही होता.त्यानंतर खतिजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.