'या' कारणांमुळं झाला मलायका-अरबाजचा घटस्फोट; सलमानही होता मोठं कारण!

मलायका आणि अरबाज आज कायदेशीररित्या एकमेकांपासून वेगळे झाले असले तरी पण बी-टाऊनमध्ये त्यांची लव्हस्टोरी खूप प्रसिद्ध होती. दोघंही बराच काळ एकमेकांसोबत राहिले होते. अनेक कारणांमुळे त्यांचं वैवाहिक जीवन बिघडलं. त्यांच्यात घटस्फोटाची अनेक कारणे आहेत.

Updated: Aug 4, 2023, 03:30 PM IST
'या' कारणांमुळं झाला मलायका-अरबाजचा घटस्फोट; सलमानही होता मोठं कारण! title=

मुंबई : अभिनेता अरबाज खान आज आपला 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. नेहमी अरबाज त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आज अभिनेत्याचा वाढदिवस आहे. अनेक सेलिब्रिटी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही देताना दिसत आहेत. आत्तापर्यंत अरबाजने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या कौशल्याची जादू दाखवली. पण त्याला हवं तसं यश मिळवता आलं नाही. आज अरबाज खानच्या वाढदिवसानिमीत्त आम्ही तुम्हाला अरबाज आणि मलायकाच्या नात्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत. 

मलायका आणि अरबाज आज कायदेशीररित्या एकमेकांपासून वेगळे झाले असले तरी पण बी-टाऊनमध्ये त्यांची लव्हस्टोरी खूप प्रसिद्ध आहे. दोघंही बराच काळ एकमेकांसोबत राहिले होते. अनेक कारणांमुळे त्यांचं वैवाहिक जीवन बिघडलं. त्यांच्यात घटस्फोटाची अनेक कारणे आहेत. चला तर जाणून घेऊया १८ वर्ष एकत्र राहिल्यानंतर हे कपल का वेगळं झालं. 

मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटामागे आयपीएलमधील फिक्सींग हेही एक कारण असल्याचं मानलं जात आहे. काही वर्षांपूर्वी आयपीएलच्या एका सामन्यात त्याला 2.75 कोटी रुपये गमवावे लागले होते. त्यामुळे त्याला ठाणे गुन्हे शाखेत जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आलं होतं, त्यावेळी त्याने सहा वर्षांपासून आयपीएल सामन्यांवर पैसे लावत असल्याची कबुली दिली. सूत्रांच्या माहितीनुसार  मलायकाच नव्हेतर त्याचे वडील सलीम खान आणि कुटुंब त्याच्या या कृत्यामुळे खूप नाराज होते.

अरबाजच्या कुटुंबात सलमान खानची कारकीर्द उंचीवर होती तर दुसरीकडे अरबाजची कारकीर्द मात्र पूर्णपणे बुडाली होती. हीच गोष्ट मलायकाला खटकत होती. सुरुवातीला तिने हे अरबाजला अनेकदा समजावून सांगितलं पण तो त्याच्या करिअरवर लक्ष देत नव्हता. तर दुसरीकडे, अरबाजचं सलमानच्या हाताखाली काम करणंही मलायकाला पसंत नव्हतं.

एकदा एका मुलाखतीदरम्यान मलायकाने असंही  सांगितलं होतं की,  सलमानला तिचा ड्रेसिंग सेन्स, तिचे मित्र आणि इतर अनेक गोष्टी आवडत नव्हत्या. तो तिला नेहमी तिच्या ड्रेसबद्दल टोमणे मारायचा. इतकंच नाही तर या गोष्टींवरून अरबाज आणि तिच्यात अनेकदा भांडणही व्हायचं.

विभक्त झाल्यानंतर मलायका आणि अरबाज कितीही व्यस्त असले तरी मुलासाठी भक्कम उभे असतात. तिघांचे अनेकदा व्हिडिओही सोशल मीडियावर समोर येत असतात.  त्यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट आणि लाईक्स येत असतात.  काहींनी दोघांच्या पालकत्वाचं कौतुक करतात. तर काहीजण त्यांना त्यांच्या भेटण्यावरुन ट्रोलही करतात. त