'कबीर सिंग' फेम अभिनेत्रीसोबत गायक जुबिन नौटीयालचा साखरपुडा संपन्न? फोटो व्हायरल

गायक जुबिन नौटियाल आणि 'कबीर सिंग' फेम अभिनेत्री निकिता दत्ता यांच्या लग्नाची सोशल मीडियावर गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. 

Updated: Mar 24, 2022, 04:30 PM IST
'कबीर सिंग' फेम अभिनेत्रीसोबत गायक जुबिन नौटीयालचा साखरपुडा संपन्न? फोटो व्हायरल title=

मुंबई : गायक जुबिन नौटियाल आणि 'कबीर सिंग' फेम अभिनेत्री निकिता दत्ता यांच्या लग्नाची सोशल मीडियावर गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. आता दोघांचा एक फोटो समोर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जुबिन आणि निकिता एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात होतं. अनेकदा त्यांना डिनर डेट आणि कॉफी डेटनंतर हॉटेलमधून बाहेर पडताना स्पॉट करण्यात आलं आहे. 

एवढंच काय तर अशी देखील बातमी समोर आली होती, की निकिताने जुबिनच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. रिपोर्टनुसार, निकिता नुकतीच उत्तराखंडमधील जुबिनच्या गावी गेली होती. तर जुबिन लग्नाच्या आयोजनासाठी आणि निकिताला भेटण्यासाठी मुंबईत आला होता.

दोघांनी साखरपुडा केल्याचं बोललं जात आहे. साखरपुड्याचे काही फोटो देखील समोर आले आहेत. चाहत्यांना त्यांच्या लग्नाबाबत शंका असताना हे फोटो समोर आल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

पण दोघांनी अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नसताना याबाबत संभ्रम काय आहे. पण आता जुबिनने हे जाहीर केलं आहे की, हे गाण्याच्या  शूट दरम्यानचे काही क्षण आहेत. एका गाण्यामध्ये दोघांनी साखरपुडा केला असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. जुबिन याबाबत सोशल मीडियावर घोषणा केली आहे.