close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अर्जून कपूर आता या अभिनेत्रीचा 'बॉडीगार्ड'

पुन्हा एकदा नावाची चर्चा 

Updated: Sep 20, 2019, 12:53 PM IST
अर्जून कपूर आता या अभिनेत्रीचा 'बॉडीगार्ड'

मुंबई : एक अशी वेळी जेव्हा बॉलिवूडमधील दोन अभिनेते मिळून कतरिना कैफ विरोधात एक फेसबुक पेज चालवत होते. I Hate Katrina असं या पेजचं नाव होतं. या पेजच्या नावावरून तुम्हाला अंदाज येत असेल की, ते दोघं तिचा किती राग करायचे. 

पण बॉलिवूडमधील काही गोष्टी काळानुरूप बदलतात. अर्जून कपूर आणि कतरिना कैफ यांच्यात आता चांगली मैत्री झाली आहे. आणि ही मैत्री गुरूवारी मुंबईत अधोरेखित झाली आहे. अर्जून कपूर आणि कतरिना कैफ गुरूवारी सोनम कपूर आणि दुलकर सलमानच्या 'द जोया फेक्टर'च्या स्पेशल स्क्रिनिंगला एकत्र पोहोचले होते. 

katrina kaif

सिनेमापाहून झाल्यावर कतरिना जेव्हा निघाली तेव्हा अनेक चाहत्यांनी तिला सेल्फीसाठी घेरलं. तेव्हा सगळ्यांना बाजूला करत अर्जून कपूर कतरिनाची सुरक्षा करण्यासाठी पुढे सरसावला. एवढंच नव्हे तर अर्जून कतरिनाला तिच्या कारपर्यंत सोडायला गेला. 

katrina kaif

यावरून हेच लक्षात येतं की, बॉलिवूडमधील वाद आणि मतभेद हे काही काळापुरतेच असतात. अर्जून आणि कतरिनामधील मैत्री ही सोशल मीडियावर देखील झळकली आहे. आयफा पुरस्कार सोहळ्यातील फोटो कतरिनाने इंस्टाग्रामवर शेअर केला. त्यावर फोटोवर अर्जूनने न चुकता कमेंट केल्याचीही दिसत आहे. 

कामाबद्दल बोलायचं झालं तर, अर्जून कपूर सध्या आपला आगामी सिनेमा 'बॅटल ऑफ पानीपत'च्या तयारीत आहे. या सिनेमाकरता अर्जून कपूरने मुंडन केलं आहे. अर्जून कपूरसोबत या सिनेमात क्रिती सेनन, संजय दत्त, जीनत अमान आणि पद्मिनी कोल्हापुरे दिसणार आहे. तर कतरिना सध्या रोहित शेट्टीच्या आगामी सिनेमात 'सूर्यवंशी'चं शुटिंग करताना दिसत आहे. यामध्ये ती अक्षय कुमारच्या अपोझिट दिसणार आहे.