मलायकाच्या आधी खान कुटुंबातील 'या' व्यक्तीला डेट करायचा अर्जुन कपूर

सलमान खानचा देखील या गोष्टीला होता पाठिंबा 

Updated: Jun 26, 2021, 08:44 AM IST
मलायकाच्या आधी खान कुटुंबातील 'या' व्यक्तीला डेट करायचा अर्जुन कपूर

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने आपल्या पहिल्याच सिनेमातून चाहत्यांच मन जिंकल होतं. 'इश्कजादे' या सिनेमातून अर्जूनचा अंदाज वेगळा होता. यामुळे डेब्यू सिनेमातूनच अर्जुनने बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली होती. मात्र अर्जून कायमच आपल्या करिअरपेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला. (Arjun Kapoor before Malaika Arora date Salman Khan Sister Arpita ) आज अर्जूनचा 36 वा वाढदिवस आहे. 26 जून 1985 मध्ये अर्जुनचा जन्म झाला.

अर्जून कपूरचं सलमान खानच्या कुटुंबाशी एक वेगळं नातं आहे. या कुटुंबासोबत त्याच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. पण याला फक्त मलायकाच जबाबदार नाही तर मलायकाच्या अगोदर अर्जुन कपूर खान कुटुंबातील 'या' व्यक्तीला डेट करत होता. 

अर्जुन कपूर सलमान खानची लाडकी बहिण अर्पिता खानला डेट करत होतात. अर्जुन-अर्पिता एकमेकांना 2 वर्षे डेट करत होते. अर्जून आणि अर्पिता जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा अर्जूनने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली नव्हती. अर्जूनने एका मुलाखतीत सांगितलं की,'माझ्या आणि अर्पिताच्या नात्याबद्दल सलमान खानला कळलं तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. मात्र कालांतराने सलमान समजून गेला.'

ब्रेकअपनंतरही सोडला नाही अर्जूनची साथ 

अर्जुन कपूरने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ब्रेकअपनंतरही सलमान खानने माझी साथ सोडली नाही. तो कायमच माझ्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे वागला आहे. तसेच मी-अर्पिता रिलेशनशिपमध्ये होतो तेव्हा देखील ते माझ्याच साईडने असतं. 

सलमान खानच्या वहिनीसोबत अर्जून रिलेशनशिपमध्ये 

सध्या अर्जून कपूर सलमान खानची वहिनी अभिनेत्री मलायका अरोराला डेट करत आहे. मलायका आणि अर्जून रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा मलायका आणि अरबाज यांचा घटस्फोट देखील झाला नव्हता. या दोघांच्या नात्याबद्दल कपूर आणि खान या दोन्ही कुटुंबाला धक्का बसला होता. मात्र असं असूनही अर्जून आणि मलायका कायमच एकत्र राहिले. महत्वाचं म्हणजे मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटानंतर अर्जून-मलायकाने सोशल मीडियावर आपल्या नात्याची कबुली दिली. 

हे दोघं अनेकदा कार्यक्रमांमध्ये दिसले आहे. एवढंच नव्हे तर मलायका-अर्जुन हे दोघं एकमेकांसोबत फिरताना दिसले आहेत.