मुंबई : देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही ११,१८,०४३ इतकी झाली आहे. कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. आता प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि दिग्दर्शक अर्जुन सरजाची मुलगी ऐश्वर्या अर्जुनला करोनाची लागण झाली आहे. ऐश्वर्या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. २०१३ मध्ये तिने कलाविश्वात पदार्पण केलं.. खुद्द ऐश्वर्याने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी दिली.
इन्स्टाग्रामवर तिने एक पोस्ट शेअर केली आहे. 'माझा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला घरीच क्वारंटाइन करण्यात आले असून डॉक्टरांनी सांगितल्यानुसार सर्व उपचार केले जात असल्याचं सांगितलं आहे.
शिवाय, माझ्या संपर्कात जे कोणी आले आहेत त्यांनी तात्काळ स्वतःची कोरोना चाचणी करून घ्या आणि मास्कचा नियमित वापर करण्याचा सल्ला देखील तिने चाहत्यांना दिला आहे. त्याचप्रमाणे तिचा चुलत भाऊ ध्रुव सरजा आणि त्याची पत्नी प्रेरणा यांना करोनाची लागण झाली होती.
ध्रुव सर्जाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. 'माझ्या पत्नीला आणि मला करोनाची लागण झाली आहे. आमचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या आम्ही दोघंही रुग्णालयात अॅडमिट आहोत. ' असं तो ट्विटमध्ये म्हणाला.