'बायको आहे मी त्यांची' नेटकऱ्यांच्या विचित्र कमेंटवर दादूसच्या पत्नीचं सडेतोड उत्तर

Arun Kadam Wife: अभिनेते अरूण कदम हे आपल्या सगळ्यांचेच लाडके विनोदी कलाकार आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांच्या पत्नीची फार चर्चा आहे. यावेळी एका नेटकऱ्यानं केलेल्या कमेंटमुळे त्यांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 21, 2023, 03:48 PM IST
'बायको आहे मी त्यांची' नेटकऱ्यांच्या विचित्र कमेंटवर दादूसच्या पत्नीचं सडेतोड उत्तर title=
arun kadam savage reply on comment video viral

Arun Kadam Wife: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही विनोदी मालिका घराघरात पोहचली आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार हे अत्यंत लोकप्रिय आहेत. बऱ्याच गॅपनंतर ही मालिका परत प्रेक्षकांच्या भेटीला आहे. यंदाही या मालिकेची क्रेझ ही काही कमी झालेली नाही. या शोमधील दादूस म्हणजे अरूण कदम यांचीही क्रेझ ही तितकीच आहे. काही दिवसांपुर्वी अरूण कदम यांना नातू झाला आहे. ज्याचे फोटोही त्यांच्या लेकीनं सोशल मीडिायवर पोस्ट केले होते. ज्याची बरीच चर्चा होती. अरूण कदम यांच्या नातव्याच्या फोटोवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला होता. सोशल मीडियावर कलाकार हे अनेकदा त्यांनी कुठली ना कुठली पोस्ट केली की त्यामुळे ट्रोल होताना दिसतात. असंच काहीचं अरूण कदम यांच्यासोबतही झालं आहे. सध्या त्यांची सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. यावेळी त्यांच्या पत्नीवरून त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे. नक्की काय घडलंय हे आपण यातून जाणून घेणार आहोत. 

वर म्हटल्याप्रमाणे, काही दिवसांपुर्वी अरूण कदम हे आजोबा झाले आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. आताही तिची जोरात चर्चा ही रंगलेली आहे. नुकताच त्यांनी आपल्या नातवाच्या बारश्याचे व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ते आपल्या पत्नीसोबत आणि आपल्या परिवारासोबत दिसले होते त्यामुळे त्यांची जोरात चर्चाही रंगलेली होती. परंतु या व्हिडीओखाली आलेल्या कमेंट्सवरून सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अरूण कदम यांच्या पत्नीचीही अनेकदा चर्चा असते. किंबहूना अरूण कदम यांच्या ऐवढीच प्रसिद्धी त्यांनाही आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. त्या आजही प्रचंड तरूण दिसतात. अरूण कदमच्या पत्नी अगदी चिरतरूण दिसतात हे खरे परंतु यावरून एक नेटकऱ्यानं एक विचित्र कमेंट केली आहे. 

हेही वाचा : 'टॉयलेट नाही, महिलांनी मासिक पाळीत करायचं काय?' नाट्यगृहांच्या दुरावस्थेबद्दल निवेदिता सराफ भडकल्या

यावेळी त्यांच्या या व्हिडीओखाली एका नेटकऱ्यानं विचित्र कमेंट केली आहे. या व्हिडीओत अरूण कदम यांना उद्देशून त्यांनी म्हटलं आहे की, या तुमच्या सून आहेत का? त्यावर अरूण कदम यांच्या पत्नीची त्वरित कमेंटही आली आहे. ज्यात त्या म्हणाल्या की 'मी बायको आहे त्यांची' अशी कमेंट करत त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यावर त्या नेटकऱ्यानं त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून माफी मागत लिहिलं की, 'ओके मॅम सॉरी, तुम्ही येवढ्या यंग दिसता सो' सध्या या त्यांच्या कमेंटवरून चाहत्यांबद्दल चर्चा आहे.