Ranbir Kapoor wanted to marry this bollywood actress not Alia Bhatt : 'कॉफी विथ करण'चं 8 पर्व आता सुरु होणार आहे. या कार्यक्रमातून आपल्याला नेहमीच सेलिब्रिटींविषयी वेगवेगळ्या गोष्टी कळत असतात. आता या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाची सोशल मीडियावर चर्चा सुरु असतात. त्यामुळे आता सोशल मीडियावर काही जुने किस्से देखील चर्चेत आहेत. त्यात चर्चेत असणारी एक गोष्ट म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. त्यांचं झालं असं की रणबीर कपूरनं आलिया भट्टला रिजेक्ट केलं होतं. त्या सोबत त्याला कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न करायचे होते हे देखील सांगितले.
'कॉफी विथ करण'मधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत करण जोहर हा रणबीर कपूर आणि रणवीर सिंगसोबत रॅपिड फायर खेळताना दिसत आहे. त्याची सुरुवात करण करतो की 'महिलांकडे पाहताना तू सगळ्यात आधी काय पाहतोस?' त्यावर उत्तर देत रणबीर बोलतो की 'तिचे डोळे आणि तिची पाठची बाजू.' पुढे करण त्याला विचारतो 'जर सत्य बोलण्याचं औषध या लोकांनी दिलं तर तू त्यांना काय प्रश्न विचारशील.' त्यावेळी आलियाचं नाव येताच रणबीर बोलतो, 'सिद्धार्थ मल्होत्रा की वरुण धवन.' यानंतर करण विचारतो की 'किल, मॅरी आणि हूकअप? त्यासोबत तो ऑप्शन देतो की अनुष्का, आलिया आणि जॅकलीन!' या प्रश्नावर उत्तर देत रणबीर बोलतो, 'मी अनुष्काशी लग्न करेन. पण तिचं लग्न झालं असून ती आनंदी आयुष्य जगत आहे. बाकी दोघींसोबत मी हूक अप करेन, त्यांच्यापैकी कोणाशी मी लग्न करणार नाही.'
हेही वाचा : नावही न ऐकलेल्या चित्रपटाची लोकप्रियता अक्षय कुमारपेक्षाही अधिक! 14 दिवसांचा गल्ला एका दिवसात कमवला
दरम्यान, लक्षवेधी गोष्ट म्हणजे करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शो मध्ये एकीकडे रणबीरनं आलियाशी लग्न करण्यास नकार दिला होता. तर खऱ्या आयुष्यात आता त्यांनी लग्न केलं असून त्यांना एक मुलगी देखील आहे. तर सध्या रणबीर कपूर हा त्याचा आगामी चित्रपट अॅनिमलमुळे चर्चेत आहे. त्या चित्रपटाच्या टीझरनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटात रणबीरची कधी न पाहिलेली बाजू पाहायला मिळणार आहे. तर या चित्रपटात रणबीरसोबत अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जर कॉफी विथ करण विषयी बोलायचे झाले तर त्याचं 8 वं पर्व हे 26 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 'कॉफी विथ करण'चा सेट कसा बनवण्यात आला. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल देखील झाला होता.
|
NZ
(20 ov) 175/7
|
VS |
SA
178/3(17.1 ov)
|
| South Africa beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
QAT
(20 ov) 187/5
|
VS |
BRN
191/5(20 ov)
|
| Bahrain beat Qatar by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SCO
(19.4 ov) 152
|
VS |
ENG
155/5(18.2 ov)
|
| England beat Scotland by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.